डॉक्टर अविनाश पाटील हे फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांचं साहित्य विश्वातील कार्य हे फार मोठे आहे. आगरी बोली भाषेवरती त्यांचा पीएचडीचा प्रबंध देखील प्रकाशित झालेला आहे. साहित्यातील जवळपास सर्वच प्रकार त्यांनी एकदम प्रभावीपणे हाताळले आहेत आणि आता ते
माणसाने माणसाला ओळखावे
देव तेथे भेटतो हे संतवाणी
असा मानवतावादी आणि सकारात्मक विचार घेऊन 'मनाचा एक रिकामा कप्पा' हा त्यांचा दुसरा गझल संग्रह आपल्या भेटीला घेऊन आलेले आहेत.
त्यांनी आपला हा गजलसंग्रह त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार श्री गजानन परब यांना समर्पित केलेला आहे. या गजल संग्रहाला ज्येष्ठ गझलकार मा. श्री अॆ. के. शेख सरांची खूप समर्पक अशी प्रस्तावना लाभलेली आहे. संजय शिंदे यांच्या अष्टगंध प्रकाशाला मार्फत हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे तसेच संतोष घोंगडे यांनी फार सुरेख असा मुखपृष्ठ या पुस्तकासाठी तयार केलेल्या आहे.
गजल ही काळजाची भाषा आहे. गजल ही हळव्या भावनांचे कवी मनावर झालेले गोंदण आहे .गजल अलवार पावलांनी शायराच्या काळजात शिरकाव करते आणि त्याला चूर चूर करते , घायाळ करते.. ते अस
डॉ. अविनाश पाटील यांचा हा शेर बघा.
प्रेमामध्ये असते गोडी ते फुलल्यावर
काट्यांची ही मखमल होते तू दिसल्यावर
क्या बात है अविनाश सर
सखीच्या विरहात झुरत असलेल्या शायराला आता कशाचाच आधार वाटत नाही. सखीच्या विरह वेदनेत त्याचा जीव जळत असतो, तळमळत असतो. सखीची ती विरह वेदना त्याच्या काळजाला जाळत असते ,घायाळ करत असते, काट्या सारखी बोचत असते,आणि अचानक सखी समोर येते मग शायराला सगळ्या जगाचा विसर पडतो. सखीच्या विरहाने वाळवंटासारख होरपळून गेलेलं त्याचं मन गुलाबी मखमली भावनांनी बहरून जात..
डॉ. अविनाश पाटील हे हळव्या मनाचे शायर आहेत. आणि त्यांची गजल ही त्यांच्या हळव्या मनाचं दर्पण आहे.
सखीभेटली की सखीशी खूप काही बोलायचं असतं सखीला खूप काही सांगायचं असतं. पण सखीला पाहताच शब्द ओढतच अडखळतात. मनाच्या वेदना, सोडलेल्या यातना काही - काही सखीशी बोलता येत नाही आणि मग मनाची खूप घुसमट होते. श्वास कोंडायला लागतो.
त्यांचे हे शेर बघा.
सांजवेळी मी तुझ्याशी बोलणे राहून गेले
भावभोळे दाटलेले समजणे राहून गेले
ते तुझे आतुर होणे जीव जीवा लावणे ते
मोगऱ्याच्या या फुलांचे बहरने राहून गेले
का नशिबाने करावी क्रूर थट्टा आपली ही
विझुन गेलेल्या मनाचे पेटणे राहून गेले.
परिस्थितीमुळे तर कधी समाजामुळे दोन जीवांची ताटतूट होते. जीवाचा जीव असलेली सखी एका क्षणात परकी होते. मागे फक्त उरते ती फक्त तिची आठवण.आणि तिच्या आठवणीने तळमळणाऱ्या काळजातून एक आवाज निघतो तो हा असा .
हे शेर बघा
आठवांना आवराया लागलो
मी मलाही सावराया लागलो
मी फुलांना भेटलो नाही कधी ही
काढले आयुष मी काट्यात माझे
पाऊस ओळखीचा बरसून आज गेला
डोळ्यात आसवांना सजवून आज गेला
आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेमुळे मनुष्य हा आत्मकेंद्री बनत चाललेला आहे. त्यांच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण होत चालली आहे , दुरावा निर्माण होत चाललेला आहे. नात्यांमधील भावनांची जागा आता व्यवहाराणे घेतली आहे, या समाजवेवस्थतचे सजीव चित्रण आपल्याला डॉ. अविनाश पाटील यांच्या गजलेत पाहायला मिळते. त्यांचे हे शेर बघा.
विभागून गेला असा सातबारा
कचेरीत देतो किती मी पुरावे
घरात केव्हा बेघर झालो कळले नाही
अन् एकटा कधी मी उरलो कळले नाही
डॉक्टर अविनाश पाटील यांची गजल केवळ कल्पना विश्वात रमत नाही तर वास्तवाचं जिवंत चित्रण आपल्याला त्यांच्या गजलेत पाह्यला मिळत. आजही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील कित्येक शेतकरी आपल्या माथ्यावरील कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलत आहते, तरी देखील त्यांच्या मृत्यूची साधी दखल सरकार कडून घेतली जात
नाही. सर्व जगाचा जो अन्नदाता आहे जो पोषण दाता आहे त्याचं सरकारी व्यवस्थांपासून होणाऱ्या शोषणाला वाच्य फोडण्याचे काम त्यांनी आपल्या या शेरात किती प्रभावीपणे केलेला आहे.
पोसतो साऱ्या जगाला अन्नदाता
बातमी कोठे त्याच्या शोषणाची
शेतकरी मोठ्या आशेने एका चातकासारखी ओल्या डोळ्यांनी पावसाचे आतुरतेने वाट पाहत असतो, तेव्हा पावसाचा एक साधा थेंबही पडत नाही.
आणि जेव्हा तो पडतो तेव्हा असा पडतो की सगळा संसार वाहून नेतो.
त्यांचे हे शेर बघा
संसार ओस झाला मातीत जीव गेले
सारेच आज नेले शेजार पावसाने
ओसाड शेत झाले काडी कुठे दिसेना
डोळ्यात पूर दाटे बेजार पावसाने
जेव्हा कोरोनाच्या महामारीने पूर्ण जग व्यापलेला होतं. तेव्हा माणसांची खरे रूप आपल्याला दिसायला लागलं स्वतःच्या नात्यातली माणसं एकमेकांना संशयाच्या नजरेने बघायला लागली होती एक मेकांना जाणीव पूर्वक टाळायला लागली होती पण अशावेळी हळव्या मनाचे भावना प्रधान कवी डॉ.अविनाश पाटील हे बोलून जातात.
ही बहाणे सांगण्याची वेळ नाही
माणसांना टाळण्याची वेळ नाही
जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टीला सामोरे जायला लागतं बऱ्याच वेळा उपेक्षा सहन करावी लागते. तरीही मनाचा तोल सावरून येणाऱ्या प्रसंगाला संकटाना निधड्या छातीने सामोरे जावे लागते.
डॉ अविनाश पाटील यांचे पुढील शेर बघा
भरारी घेतली आहे नव्याने
जरी नाकारले होते नभाने
वही जिंदगी वाया गेली
कुठे स्वीकारले होते जगाने
कवीचे मन हे मुळात फार हळवे असतं आजूबाजूच्या परिसराचा आणि घटनांचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम होत असतो. आजूबाजूच्या विदारक घटनांना बघून कधी त्याचा मन कष्टी होतं तर कधी त्याचं मन घायाळ होतं. आणि त्या घायाळ झालेल्या मनातून एक आक्रोश बाहेर पडतो.. तो असा
भाकरीचा चांद शोधा या निघालो
शहराचा व्यापलेले झोपड्यांनी
काम द्यावे लागते येथे भुकेला
फार झाला भाषणांचा गोषवारा
तुझ्या जिंदगीची आता प्रयत्न काय कमाई आहे असे या कलंदर शायराला विचारतात त्याचं हे उत्तर असतं.
जीवनाची ही कमाई
फार जपतो बाप आई
डॉक्टर अविनाश पाटील यांच्या वरती , त्यांचा साहित्यावरती त्यांच्या ,कवितांवरती बरंच काही बोलण्यासारखे आहे पण येथे शब्दांची मर्यादा आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मराठी साहित्य क्षेत्राच्या कक्षा डॉ. अविनाश पाटील यांच्या साहित्याने नक्कीच रुंदवणार आहेत. तूर्तास येथेच थांबतो धन्यवाद.
( सतिष अहिरे )