Monday, 11 May 2020

काळजाचा तुकडा

आज सुट्टीचा दिवस होता तरी घरी खूप गडबड होती. कारण आज मधूला  पाहण्यासाठी पुण्यावरून पाहुणे येणार होते.  सरिता सकाळी उठल्यापासूनच कामाला लागली होती. घर आवरण्यापासून तर जेवणाच्या तयारी पर्यंत सगळं तिने केल होत.
आता दहा वाजून गेले होते. तरी मधु आपल्या बेडरूम मधून बाहेर पडली  नव्हती. 
सरिता वैतागली आणि रागा- रागात मधूच्या बेडरूम मध्ये गेली.मधु अजूनही बेड वरच लोळत पडली होती. तिला तसं बघून सरीतला अजून राग आला आणि ती मधूल बोलली
" गधडे...!"
 "किती वेळ झाला आहे आणि तू अजून ही बेड वरच पडली आहेस. वेळ प्रसंग काही कळतो की नाही तुला , की सगळे दिवससारखे आहेत तुझ्यासाठी,  कालच मी तुला सांगितलं होतं की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत.
जरा उठून आईला मदत करायची तर गधडी अजून लोळत पडली आहेस."
मधुने आळस दिला , कूस बदली..आणि पुन्हा झोपली.
सरिता वैतागून मधू कडे गेली आणि तिची चादर ओढून काढली..
मधू लाडात बोलली.
" काय ग आई का कटकट करतेय, तुला माहीत आहे ना,  मला एकदाच दिवस सुट्टी असते.  ." 
सरिता पुन्हा रागात बोलली.
" हो माहीत आहे मला पण मी तुला केव्हा असं सुट्टीच्या दिवशी उठलय का ?."
मधू आळस देऊन बोलली
" हुम .. नाही उठवल."
" मग आजच का उठवतेय मी तुला ,काही लक्षात आहे का तुझ्या ?'
"काल काय सांगितलं होतं मी तुला.?
मधु तोंड वाकड करून बोलली.
" आपल्याकडे पुण्यावरून  पाहुणे येणार आहेत ते पण मला पाहायला ".
"मग" 
मधू पुन्हा लाडात बोलली.
" आई आता ते काय विमानाने  येणार आहेत का आपल्या कडे, आणि डायरेक्ट आपल्या गच्चीवर लँड होणार आहेत." अग पुण्यावरून येणार आहेत ते  अजून वेळ लागेल त्यांना यायला मला झोपू देना."
मधूनच बोलणं ऐकून सरिता अजून वैतागली आणि बोलली.
" तुला बोलून काही फायदा नाही. तुझा अवतार बघून लोक मलाच बोलतील की आई ने काही शिकवलं नाही पोरीला.."
आणि  मी सकाळ पासून राब-राब राबतेय जरा उठून आईला मदत करायची तर अजून झोपून पडली आहेस मी एकटीने कुठे कुठे आणि काय काय  बघायचं.
सरिता खूप गंभीर झाली.. अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं . तिचा आवाज जड झाला आणि दबलेल्या आवाजात ती बोलायला लागली..
"  आज तुझे बाबा असते तर."
मधूला सरीताची ती अवस्था बघवली नाही, मधू लागचे पुढे सरसावली.  तिने सरीताच्या  तोंडावर हात ठेवला. आणि बोलली
" आई , बाबा आहेत आपल्या सोबत .. ते कुठे जरी असले तरी... हा आणि आत्ता बाबांनी तुला असं रडताना बघितलं असतं तर आवडलं असतं का त्यांना." 
सारिताने नकारार्थी मान हलवली..
" मग तू का रडतेय.?" 
मधूने अलगद पणे सरीताचे डोळे पुसले आणि तिला गच्च मिठी मारली. 
मधुनी मिठी मारल्यावर सरीताला आपले अश्रु रोखता आले नाही ती तुटून गेली  आणि मधूला  बिलगून पुन्हा रडायला लागली. सरीतला रडताना बघून मधूचाही उर भरून आला आणि तीही रडायला लागली. त्या बराच वेळ एकमेकांना बिलगून रडत होत्या.
मग काही वेळाने फोन ची रिंग वाजायला लागली..फोनची रिंग एकूण सरिता भानावर आली, तिने आपली मिठीची घडी मोकळी केली. मधूचे डोळे पुसले, मधूला शांत केलं आणि अंघोळ वैगरे सर्व आवरून घ्यायला सांगितल.
आणि फोन बघितला.
पाहते तर काय फोन पो पुण्याच्या पाहून्यानाचाच होता. सारिताने स्वतःला सावरलं आणि फोन उचलला.
समोरून आवाज आला
" हॅलो.. सरिता इनामदार आहेत का
" हो मीच बोलतेय ." 
" मी प्रशांत पाटील . आज तुमच्या मुलीला बारा पर्यत बघायला यायचं अस आपलं ठरलं होत पण रस्त्यात खूप ट्राफिक लागलं आहे,  तर आम्हाला यायला जर उशीर होईल म्हणून तुमची  आधीच  माफी मागतो. हा आणि जेवणाचा वेळ तशी  निघून जाईल तर आम्ही वाटेतच जेवून येणार आहोत तर जेवणाचा काही बेत ठेवू नका."
सरिता मग पटकन बोलली.
" आहो प्रशांत असं कसं चालेल तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी येताय..
प्रशांत आदराने बोलले.
" हो सरिता जी तुमच बरोबर आहे पण आम्हाला यायला खूप उशीर होणार आहे आणि आजच्या आज आम्हाला  पुन्हा पुण्याला वापीस जायचं आहे, तर तुम्ही बिलकुल धावपळ करू नका आणि  कसला ही संकोजमना मध्ये धरू नका.
सरिता ठीक आहे असं बोलाली आणि तिने फोन ठेवला. 
प्रशांतच बोलणं ऐकून सरिता खूप  सुखावली आणि तिच्या मनात  विचारांचं चक्र सुरू झालं . खरंच किती समजुदार लोक आहेत ,किती आदराने बोलते होते प्रशांत . जर पुढे ही गोष्ट वाढली तर मधूला किती चांगलं घर भेटेल...आपली मधू त्यांना आवडेल काय..? नेमक्या कोणत्या अपेक्षा असतील त्यांच्या ?
मधूला ही मुलगा आवडेल का."? 
 सरिता आपल्याच विचारात मग्न होती तेवढयात तिकडे मधु आली मधूने आपली अंघोळ आवरली होती आणि आपले केस ती टॉवेल ने सुकवत होती . मधू साठी सारिताने आधीच साडी काढून बेड वर ठेवली होती..
त्या साडीला बघून मधू वैतागून बोलली 
" ये आई मी  काही साडी - बिडी नाही घालणार.
" का ग ? 
"  काय ग आई मी कधी साडी घालते का ? 
" बाळा पद्धत असते ती , साडी घालायला च लागते आशा वेळी.
मधू वैतागून बोलली 
" आई ते मला बघायला येणार आहे का माझ्या साडीला.." 
सरिता मधूला समजावत बोलली 
" बेटा हट्ट का करतेय तू आता ते लोक कधी ही येतील आता  तू पटापट आवर सगळं.
मधू मस्करीने म्हणाली 
" आवर काय आवर.. मला कुठे येतेय साडी घायलायला.."
सरिता हसू आलं आणि ती बोलली..
" हो ठीक आहे पण तू कधी शिकणार.. मी आहे तो पर्यंत सगळं ठीक आहे पण  मी नसल्यावर तू काय करशील ?.
सरीताच बोलणं ऐकून मधू रागात बोलली
" असं काही पण काय बोलते तू आई.." 
"  मी तुला कुठेच जाऊ देणार नाही ".हा आणि मी पण तुला सोडून कुठे जाणार नाही.
 सरिता मस्करीने बोलली 
" आता तू सासरी जाशील तेव्हा मी थोडीच असणार आहे तुझ्या सोबत." तुला एकटीलाच तिकडे जावं लागेल ना. 
" ये आई मी कुठे ही जाणार नाही तुला सोडून आणि  मीच का जायचं. त्या नवऱ्या मुलालाच आपण घरी घेऊन येऊ ते काय बोलतात ना काय ते घर जावई वैगरे तसं करू.
मधूच बोलणं ऐकून सरिता हसायला लागली आणि बोलली 
" वा...! वा...!वा..! खूप हुशार झाली आहेस तू.
बस झालं पण आता आवर पटकन , ते लोक येतील आता  कधी पण . 
मधू हातात साडी घेऊन आरशा समोर उभी राहिली. तिने आपल्या डाव्या खांद्यावर साडीचा पदर टाकला आणि  स्वतःला आरशात बघून गालातल्या गालात हसायला लागली.
सरिता भारावून मधू कडे पाहत होती. मधू नेहेमी पेक्षा तिला खूप वेगळी वाटत होती..मधुच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक  सरीताला दिसत होती.
मधूने आता साडी नेसायला घेतली, तिने भर भर मिऱ्या घालून पदर नीट केला आणि साडीला पिना लावून घेतल्या काही वेळातच ती सूंदर साडी नेसून तयार झाली.. मधूने स्वतःला पुन्हा आरशात पाहुन एक गिरकी घेतली आणि लाजयला लागली.
सरिता मधू कडे एकटक पाहत होती. सरीताला विश्वासच बसेना मधूने आज स्वतःहून साडी घातली. सरिता च्या मनात राहून-राहून विचार यालायला लागले.
" पाहता पाहता माझं लेकरू केवढ मोठं  झालं , मला कळचं नाही.."
"कोणाची दुष्ट नको लागायला, बाई माझ्या बाळाला..किती सुंदर दिसतेय आज माझं लेकरू.
मधूने सरीतला तिच्या कडे पाहताना पाहिलं आणि ती लाजली आपली नजर झुकवत ती सरीतला बोलली
" अग आई अशी काय बघतेय माझ्याकडे .."
मधूचा आवाज ऐकून सरिता भानावर आली..
आणि बोलली ..
" काही नाही ग.. डोळे भरून पाहवस वाटाय तुला.."
आज तुझे बाबा असते तर किती खुश झाले असते.. तुला अस बघून.
मधू पुन्हा नजर झुकवत लाजायला लागली.
        आता संध्याकाळ होऊन गेली होती. बाहेर निरव अशी शांतता पसरली होती पण सारिताच्या मनात विचारांचं वादळ सुरू होत.. .. तिच्या मनात ना-ना प्रकारचे विचार यायला लागले..
एवढा वेळ झाला तरीही ते लोक अजून  आले कसे नाहीत ?  पुण्यावरून यायला एवढा वेळ लागतो का ?  त्यांनी आपला विचार तर बदला नसेल ना ?
आता सरिता खूपच बेचैन झाली.. तिने प्रशांतला कॉल करायला फोन हातात घेतला 
आणि तेवढयात दारावरची बेल वाजली..
सरिताने लगबगीने दार उघडलं. पाहते तर काय प्रशांत आणि त्यांचे काही नातेवाईक दारात उभे होते..
सारिताने त्यांना आदरपूर्वक आता बोलावलं. मग काही वेळ इकडच्या तिकडच्या  गोष्टी झाल्या. 
प्रशांत ने मग सरीतला मधूला बोलवायला सांगितलं....
सारिता उठून किचन मधे आली , पाहते तर काय  मधू आधीच पाण्याचे ग्लास घेऊन आता उभी होती... तिने चहा पण करून ठेवला होता. नाश्त्याच्या प्लेट पण लावून ठेवल्या होत्या.
सरिता काही वेळासाठी एकदम आवक झाली... मधूला तिने असं कधी बघितलंच नव्हतं. घरी काही काम असलं तर मधूला आधी आई लागायची स्वतःहून तिने आज पर्यत कोणतंच काम केलं नव्हतं पण आज मधू  चक्क सगळं काम आवरून सरीताच्या पुढे उभी होती.. 
मधूने तिला एकदम  हलक्या आवाजात विचारलं ..
" आई आधी काय नेऊ...
सारिताने  इशाऱ्याने पाणी न्यायला सांगितलं.. आणि सरिता मधू सोबत बाहेर हॉल मध्ये आली.
सारिताने मधूला इशारा केला आणि पाहुण्यांना पाणी द्यायला सांगितलं.
मधू ने सर्व पाहुण्यांना पाणी दिल आणि एक बाजूला जाऊन उभी राहिली.
प्रशांत  ने मधूला सोफ्यावर बसायला संगीतल.
मधूने लागेच सरीताकडे  पाहिलं. सारिताने इशाऱ्याने मधूला बसायला सांगितलं.. आणि मग मधू सोफ्यावर बसली..
प्रशांत मग मधूला प्रश्न विचारायला लागेले.
मधू समजुतदार पणे सगळं ऐकत होती आणि धीराने सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होती.. सरिताला मधूच ते वागणं भारावून टाकत होत. सरीतला वाटत होतं की एव्हड्या सगळ्या लोकांना बघून  मधू घाबरून जाईल.. पण एवढ्या समजूतदारपणा आणि आत्मविश्वासाने ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती.
काही वेळात तो कार्यक्रम आवरला..  प्रशांत ने मधू साठी होकार दिला आणि ते जायला निघाले..
सारिताने त्यांचा हसत मुखाने निरोप घेतला..
सारिताने आता मोकळा श्वास घेतला.. सगळं कस तिच्या मनासारखं झालं होत. तिला आनंदी व्हायला हवं होतं. पण तिच्या आतून काही तरी तुटल्यासारख वाटत होतं..मधू आता आत कपडे बदलायला गेली होती . पाहुणे ही आता निघून गेले होते.. घरात एका वेगळ्याच प्रकारच्या शांततेचा  तिला अनुभव होत होता..
तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं..
हे गेल्यानंतर मधू होती म्हणून जगता आलं मला..मधू जर नसती तर केव्हाच जीव दिला असता मी. 
अगदी काल-पर्वाचीच गोष्ट वाटतेय मला.. मधू तानुल्या पावलांनी अंगणात चालत होती... बोबड्या आवाजात मला बोलावत होती..
पण ही अशी चटकन मोठी कस काय झाली एवढी समजुदार कस काय झाली.
मधू तू का एवढी मोठी झाली पटकन..
अरे काय ही रीत असते जगाची , काळजाच्या तुकड्याला एक  क्षणात परक करून टाकाव लागत.
मधू ही आपल्या पासून दूर जाणार या विचारानेच सरीता चा उर   भरून आलं..आणि  टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. 
 आता रात्र झाली होती ,बाहेर गर्द काळा असा अंधार पडला होता आणि आता सरिता तशीच पाणावलेल्या डोळ्यांनी सोफ्यावर बसली होती... 
मधूची एक एक आठवण काढत...

Sunday, 26 April 2020

हुंदका

बराच वेळ झाला तरी विराज अजून घरी आला नव्हता.  वसुधाला विराजची खूप चिंता वाटत होती.  सूर्य आता  मावळायला लागला होता. संध्याकाळचा मंद वारा अंगाला झोंबत होता. वसुधा विराजला पाहण्या साठी सारखी आता-बाहेर करत होती. शेवटी हताश होऊन ती ओट्यावर येऊन बसली. अंगणात सुकलेल्या पानांचा सडा पडला पडलेला होता . बाहेर नितांत अशी शांतता होती. दूर दूर पर्यंत कोणीच दिसत नव्हतं. तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं.
 आमच्या लग्नाला तीस वर्षे पूर्ण झाले. ते नेहमी मला सांगूनच घराच्या बाहेर जायचे आणि वेळेत घरी परत यायचे. या तीस वर्षात त्यांनी कधीच आपला दिनक्रम बदला नव्हता. पण आज मात्र ते खूपच विचित्र वागले .
मला सकळी दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि चटकन जाग आली. पाहते तर काय , यांनी माझ्या आधी उठून सगळं आवरलं होत आणि ते कुठेतरी जायला निघाले होते.
मी त्यांना विचारलं .
" आहो कुठे निघालात." 
तरी ते मला काही बोलले नाही , तशीच त्यांनी आपली सायकल काढली आणि न बोलताच  निघून गेले.आता बराच वेळ होऊन गेला होता. सूर्य  देखील आता मावळला होता. सगळी कडे अंधार पसरला होता तरी विराज अजून आला नव्हता. जरा कसली चाहूल लागली तरी वसुधाला विराजचा भास होत होता. वसुधा आता खूपच बैचेन झाली तिच्या मनात ना- ना प्रकारचे विचार यायला लागेल होते . ती स्वतःलाच प्रश्न विचारायला लागली.
" हे आज असे का वागेल असतील ?" 
" नेमकं काय चाललं असेल यांच्या मनात"? 
" यांनी स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर.? या विचारांनी वसुधा आता खूपच बैचेन झाली.. तिला नेमकं  काय करायचं हे कळत नव्हतं. 
वसुधाचा उर  भरून आला आणि तिच्या डोळयात एकदम टचकन पाणी आलं..
वसुधा पाणावलेल्या डोळ्यांनी विराजची वाट बघायला लागली.
थोड्या वेळाने तिला सायकलचा आवाज आला. ती धावत - पळत. अंगणातल्या गेट जवळ आली .. तिला दुरून  विराज येताना दिसला. विराजला पाहून तिचा जिवात - जीव आला.. वसुधाने पदराने आपले डोळे पुसले..आणि  ती तिथेच उभी राहिली.
विराज अंगणात आला तरी  तो वसुधाशी  काही बोलला नाही .
वसुधा आता खूपच वैतागली  आणि  रागाच्या भरात बोलायला लागली.
" आहो कुठे गेले होते  सकाळ पासून "? 
" तुम्ही बोलत का नाहीये माझ्याशी ".
" तुम्हाला नेमकं काय झालं आहे ." 
विराज तरीही  वसुधाशी काहीच बोलला नाही.. तो घरात जायला लागला . वसुधा आवेगाने विरजच्या जवळ आली आणि बोलली 
" आहो , आता काय जीव घेणार आहेत का तुम्ही माझा "?
" बोलना काहीतरी !
विराज ने वसुधाच्या डोळ्यात बघितलं आणि क्षणात आपली नजर झुकवली.
आपल्या हातातली पिशवी त्याने वसुधाच्या हातात दिली आणि तिला बोललं.
" वसुधा  खाऊन घे काही , सकाळ पासून तू काहीच खाल्लं नसणार" आणि घरात निघून गेला.
वसुधाने पिशवी उघडून बघितली त्यात शिळ्या भाकरी होत्या आणि एका डब्यात आमटी होती.
 वसुधा मग  घरात आली. तिने मांडणी वरून ताट काढलं आणि त्या शिळ्या भाकरी ताटात काढून घेतल्या. हंड्यातून पाण्याच्या तांब्या भरून घेतला आणि विरजच्या बाजूला येऊन बसली. विराज अजूनही गप्पचं होता तो  खिडकी कडे एकटक पाहत काही विचार करत बसला होता.. वसुधा त्याला बोलली .
" आहो,  तुम्ही पण जरा काही खाऊन घ्या ना .मला माहित आहे तुम्ही पण अजून काही खाल्लं नसणार ". 
विराजने वसुधाकडे  शून्य नजरेने पाहिलं.. आणि बोलला.
" मला भूक नाही ये."
" आहो,  तुम्ही जर काही खाल्लं नाही  तरी  एक साधा घास तरी जाईल  का मला".
" आहो ,खाऊन घ्या ना जरा." 
" तुम्हाला माझी शप्पथ आहे.!"
वसुधाने घास घेतला आणि ती विराजला भरवायला लागली.  नाही -नाही  म्हणत  विरजने तो घेतला , कारण विराजचा आता नाईलाज झाला होता . वसुधाने त्याला आपल्या शप्पथ देऊन अडकवल होत.
आता विराज पण वसुधाला भरवायला लागला होता.. त्यांनी एकमेकांन कडे पाहिले.. आणि भारावून गेले.. थोड्या वेळा साठी त्यांना सगळ्या जगाचा , दुःखाचा विसर पडला.
काही वेळात मग त्यांनी जेवण उरकलं. वसुधाने घर आवरायला घेतलं.. विराजने गोधडी अंथरली आणि अंथरुणावर पडला. वसुधा पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तो तिने विराजच्या उशाशी  ठेवला आणि अंथरूणावर पडली..
काही वेळसाठी कोणीच काही बोललं नाही. पण शेवटी वसुधाला राहवलं नाही आणि तिने विराज ला प्रेमाने विचारलं.
" आहो बोलना नक्की काय झालं आहे."
विराज खूप गंभीर झाला आणि बोलला.
" वसुधा आज हरलो मी". 
" सार काही संपलं !"
वसुधा गहिवरलेल्या आवाजात बोलली
" आहो असं का बोलताय"
" वसुधा या पोटच्या आगी पाई आज मी एवढा वर्ष कमावलेली इज्जत- मानमर्यादा आत्मसन्मान सगळं विकून आलो" 
विराजचा भावनांचा बांध आता फुटला होता ..एखादा पत्यांचा बंगला जसा कोसळावा तास विराज वसुधा समोर कोसळून पडला. .. विराज ने जोरात हंबरडा फोडला आणि तो रडायला लागला... वसुधाने त्याला एकदम गच्च मिठी मारली. विराजची ती अवस्था बघून वसुधाला ही कसतरीच झालं. ती ही मग वेड्या सारखी रडायला लागली.
विराज ने वसुधला रडतांना बघितलं आणि तो भानावर आला..त्यांनी ही वसुधला मग गच्च मिठी मारली.. बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत रडत होते.
काही वेळाने दोघेही शांत झाले. मग विराज बोलायला लागला
" हे  असं किती दिवस चालणार".? 
" महिना झाला तरी सगळा देश बंद करून ठेवला आहे यांनी".
वसुधा धीर देत बोलली 
" आहो हे दिवस पण जातील "
" हा रोगच आसा आलाय की त्याला कोण काय करु शकतं .. रोज किती तरी माणसे मरताय त्याने.
विराज खूप बैचेन होऊन बोलला 
" वसुधा जग जरी थांबलंना तरी पोटाची आग काही केल्या थांबत नाही, हे कळत कसं नाही लोकांना..आग आपल्या सारख्या हातावर पोट असणाऱ्या माणसाने जगायचं तरी कसं. या कोरोनाने मरण्या आधी कित्येक लोक भूकेने मरतील.
वसुधा चिंतेच्या स्वरात बोलली
" हो बरोबर बोलताय तुम्ही , कसं तरी चार घरच भांडी धुवायचे काम मोठ्या मुश्किलने मला भेटलं होत. घराला थोडाफार तरी हातभार लागत होता . पण महिना सगळं काम बंद आहे .या वयात आता दुसरं काही काम पण करता येत नाही मला  .
" पण सगळं ठीक होईल. देव आपली परीक्षा बघतोय.." 
विराज वैतागून बोलला .
" देवा तुझ्या हृदयाला पाझर तरी कधी फुटेल रे.. की तेही दगडा सारखा झालं आहे तुझ्या मूर्ती प्रमाणे.
वसुधा धीराने पुन्हा बोलायला लागली 
" या आधी ही आपल्यावर किती संकट आली पण तुम्ही किती धीराने त्याला सामोरे गेलात.
विराज खूप बैचेन झाला आणि उठून बसला  पुढे हताश होऊन  बोलायला लागला 
" वसुधा या मनगटात अजून खूप ताकद आहे .पण हाताला कामच नाही .. मी काय करू आता मला काहीच कळत नाही ये.
वसुधा ही आता  उठली तिने विराजच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलायला लागली 
" मी काही ओळखत नाही का तुम्हला.. तुम्ही आता पर्यंत एवढ्या हिंमतीने सगळं केलं.. घरच्यांचं आजार पण  मुलाचं शिक्षण सारंच काही तुम्ही केलं  मला वाटलं होतं की आपला मुलगा आधार होईल आपला पण काल आलेल्या पोरीच्या मोहात पडून त्यांने वेगळा संसार थाटला..
आई - बापाला विसरला तो.
विराज रागात बोलला 
" नाव काढू नको त्याच!" 
" हो , हो नाही काढत त्याच नाव पण तुम्हाला आठवत का तेव्हा मी किती खचून गेले होते . तुम्हीच मला सावरलं होते तेव्हा.
" तुम्ही मला काय बोलला होता तेव्हा लक्षात आहे का तुमच्या? 
" हो आहे लक्षात." 
" काय बोलला होतात ? "
" तुझा माझ्यावर विश्वास आहे का  ? 
" हो आणि मी तुम्हाला काय उत्तर दिलं होतं तेव्हा" 
" तू बोलली होतीस ," माझा तुमच्यावर माझ्या पेक्षाही 
वसुधाने आपला हात विरजच्या ओठावर ठेवला ,त्याला गप्प केलं आणि बोलायला लागली
" माझा तुमच्यावर माझ्या पेक्षाही खूप जास्त विश्वास आहे आणि आज ही मी तुम्हाला तेच बोलते आहे की माझा तुमच्यावर माझ्या पेक्षा ही  खूप जास्त विश्वास आहे , मला खात्री आहे की तुम्ही सगळं ठीक कराल . तुम्ही सोबत असलात की मला कसलीच चिंता नाही कसलीच फिकर नाही. 
विराज चिंतेच्या स्वरात बोलला
" वसुधा तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे." 
वसुधा विश्वासाने बोलली .
" परिस्थिती कशी ही असो मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.
का धीर सोडता."
" या वयात ही तुम्ही पडेल ते काम केलं. अगदी सकाळी पेपर टाकण्या पासून ते दुधाच्या पिशव्या पोहोचवण्या पर्यंत सगळं तुम्ही केलं.. त्याच्यानेही घर खर्च निघत नाही म्हणून हॉटेलात नोकरी केली ..लोकांचं उष्ठ- खरकट्ट काढलं..राब- राब राबला पाई- पाई जोडत गेलात.. आणि आपली एक छोटीशी चहाची टपरी टाकली.." 
"  सगळं कसं ठीक चाललं होतं .बाकी काही नाही पण आपल्याला पुरेल एवढा तरी पैसा येतं होता..मी ही कामाला जात होते त्याचा ही जरा हात भार लागत होता.
विराज ने होकार भरला आणि तो पुन्हा शांत झाला
वसुधाने विचारल
" आहो आज नक्की काय झालं तुम्ही सांगितलंच नाही मला. 
विराज गहिवरलेल्या आवाजात बोलला
" वसुधा नको विचारू काही मला झोप आता." 
" जर तुम्ही मला काही सांगितलं नाही तर मला झोप तरी कशी लागेल.. तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि मला काहीच कसं कळतं नाहीये..
" वसुधा तुला माहीत आहे , मला खोटं नाही बोलता येत तुझाशी ..
" हो माहीत आहे मला " . आहो सांगना मला काय झालं ते नाहीतर झोपच नाही लागणार मला सारख तेच ते डोक्यात चालत राहील".
विरजने स्वतःला जरा सावरलं धीर एकवटला आणि बोलायला लागला 
" वसुधा तू जरी मला काही सांगितलं नाही तरी मला कळत सगळं. आठवडा झाला घरात अन्नाचा दाना नाही ये .सुरुवातीला लोकांनी मोठ्या मनाने मदत केली पण बरेच दिवस आता कोण आपल्याकडे फिरकल नाही .म्हणून आज लाज शरम सगळी  बाजूला ठेवून मी जेवढ्या लोकांना ओळख तो त्या सगळ्याकडे गेलो,  काही खायला भेटत की ते मागायला नाहीतर काही किराणा भेटतो का ते मागायला.पण रोज मरे त्याला कोण रडे ही गत झाली. ओळखीची लोक अनोळखी सारखी वागत होती. बऱ्याच लोकांकडे तर जाता पण आलं नाही  कारण गल्ल्या बंद होत्या. काहींची आपल्या सारखीच अवस्था होती.. दिवसभर खूप फिरलो तरी काही भेटलं नाही..
शेवटी लाज शरम सगळी बाजूला ठेवून मारुतीच्या मंदिराच्या बाहेर भीक मागणाऱ्याच्या लाईन मधे जाऊन बसलो.. आधी मला भीती वाटत होती कोणी ओळखीच्या ने बघितलं तर काय होईल पण नंतर  पोटाची आग आतून आवाज देत होती . लाज -शरम, मान सन्मान ,स्वाभिमान यांच्यावर पाणी टाकून मी  तिकडे भीक मागत बसलो..बऱ्याच  वेळाने तिकडे एक भली मुलगी आली आणि  तीने ती भाकर आणि आमटी दिली. मी तसाच मग घरी परत आलो. मला माहित होतं की तू ही सकाळ पासून उपाशी आहेस..
विराजचा तोल पुन्हा गेला आणि तो ढसा ढसा रडायला लागला..
विराजच बोलणं ऐकून वसुधा एकदम सुन्न झाली..तिला खूप मोठा धक्का बसला  होता .. तिचा  ही तोल गेला ती चटकन उठली आणि दरवाजा उघडून बाहेर आली .. आपलं पदर तिनी तोंडाशी गच्च बांधला आणि ती रडायला लागली..बाहेर 
 नितांत अशी शांतता होती..आणि आता फक्त त्या दोघांच्या हुंदक्यांचा आवाज वातावरणात घुमत होता.
                                       .....  सतिष अहिरे

Monday, 20 April 2020

शहाणपण

मला उद्या खूप लवकर कामाला जायचं होतं. उद्या गुरुकुलचा एक्सट्राचा तास होता. मला शाळेचं पण भरपुर काम करायचं होतं आणि उद्याच्या-उद्याच मला ते शाळेत जमा करायचं होत,पण आज दिवसभर माझी खूप धावपळ होणार होती .  कारण यांची तब्बेत आज काही ठीक नव्हती, म्हणून मार्केट मधून भाजीपाला आणण्या पासून ते आनुजाला शाळेतून आणण्या पर्यत सगळं मलाच करावं लागणार होतं
मला यांची खूप चिंता वाटत  राहते . हे कधी ही  स्वतःची काळजी नीट घेत नाहीत. आजारी असले तरी सांगत नाहीत. सगळा आजार अंगावर काढतात.डॉक्टर कडे पटकन जात नाहीत. गोळ्या घ्यायचा कंटाळा करतात. मी किती जरी समजवल त्यांना तरी ,माझं ते काहीच ऐकत नाही.
             आज अनुजा पण खूप गप्प गप्प होती सकाळ पासून. ती अशी कधी गप्प गप्प राहत नाही, मला तिची ही  खूप काळजी वाटत होती.अनुला खूप लाडून ठेवलं आहे यांनी. माझं ती बिलकुल ऐकत नाही. तिला नुसते पापा पाहिजे असतात आणि मी तिला शाळेत घ्यायला गेलेलं  तिला बिलकुल आवडत नाही. आज मी एवढी धावत --पळत गेली तिला शाळेतून परत आणण्यासाठी, तरी मला  बघून ती खूप वैतागली..आणि तावातावाने मला बोलायला लागली.
" ये आऊ तू का आली ? पापा येणार होते ना मला घ्यायला मग तू का आली ?
मी जरा रागाने बघितलं तिच्या कडे पण तीच माझ्याकडे लक्षच नव्हतं ती आपल्याच धुंदीत बोलत होती.
" पापा आज की नाही मला ते गुप्ता अंकल आहेत ना त्यांच्या कडे पाणीपुरी खायला घेवून जाणार होते..नंतर आम्ही ते शिवलिंग काका आहेत ना त्यांच्या कडे आईसक्रीम खायला जाणार होतो.
" आऊ मला आताच्या आत्ता घेऊन चल  पाणीपुरी खायला
" हट आऊ तू का आली ?  तू जा आताच्या आता  घरी आणि पापांना वापीस पाठव.
अनु खूप झाला आगावपणा, काही पाणीपुरी वैगरे मिळणार नाही तुला. चुपचाप घरी चल.मला बाकीची पण बरीच कामे  करायची आहेत .
अनु एकदम लाडात येऊन बोलली मग
"ये आऊ तू एकदम  डाकू आऊ आहेस. मला ओरडली ना तू  थांब तुझं नावच सांगते मी आता पापांना
जा खुशाल सांग.. मग  बघतेच मी  तुला आणि तुझ्या पापांना पण..खूप लाडून ठेवलं आहे तुला तुझ्या पापांनी
अनुने तोंड वाकड केलं आणि माझ्या सोबत चालायला लागली.
बराच वेळ ती काही बोलली नाही पण तिला नंतर राहवलं नाही. 
"आऊ नेहेमी पापा येतात ना मला घ्यायला मग आज तू का आली मला घ्यायला  ? 
पापा का आले नाहीत ? 
मी मग  प्रेमाने सांगितलं तिला
अग पापांची तब्बेत ठीक नाही ये,  म्हणून आज ते आले नाहीत तुला घ्यायला. 
अनु एकदम चिंतेच्या स्वरात अधीरतेने बोलली
"ये आऊ काय झालं गं पापांना ?  सांग ना नीट मला ." सकाळी पण काही नीट बोलले नाही ते माझ्याशी .
बेटा तू आता पटापट चल म्हणजे आपल्याला लवकर जात येईल ना घरी मग तुला कळेल की नेमकं काय झालं आहे.
अनु मग एकदम शांतपणे चालायला लागली.. नेहेमी शाळेतून येताना मला हे पाहिजे मला ते पाहिजे असा हट्ट करणारी अनु आज मात्र खूप शांतपणे चालत होती.
आम्ही काही वेळात घरी पोहोचलो. अनु धावत पळतच त्यांच्या रूम मध्ये गेली आणि त्यांच्या उशाशी जाऊन बसली. अनुची चाहूल लागताच  त्यांना जाग आली. अनुला कवेत घेण्यासाठी ते कूस बदलून उठायला लागले..आणि बोलले 
" अनुताई कधी आली गं तू..?
   शु.!!!
" पापा बोलायचं नाही तुम्ही...
" का ग बेटा ?"
" तुम्ही आजारी आहाता ना."
"तुला कोणी सांगलीत" ? 
" आऊ ने सांगितलं मला .
" हो बेटा पण  काही खास आजारी नाही ये .    
  तू ये माझ्या कडे " 
" चुपचाप झोपा पापा मी गाई गाई करते ना."
अनुने त्यांना काहीच बोलु दिले नाही... त्यांच्या कपाळावर अलगद हाताने थापत ती त्यांना झोपवत होती..तीच ते वागणं बघून मी खूप भारावून गेले होते.... अवघ्या दहा वर्षाच माझं ते लेकरू पण आज किती शहाण्यासारखं वागत होतं.
बराच वेळ झाला अनु त्याच्या उशाशी बसून होती. किती वेळचा तिने आपला शाळेचा साधा ड्रेस पण बदला नव्हता. मी किचन मधून ओरडली तिला 
ये अनु गधडे!!
 काय करतेय कधीची... अजून साधे शाळेचे कपडे पण बदलले नाही तू..
माझा आवाज ऐकून ती रागा-रागात किचन मधे आली आणि बोलली 
" आऊ तुला कळत नाही का पापांची तब्बेत ठीक नाही ये.."?
" पापा आत्ताच झोपले आहे" 
हो माहीत आहे मला पण जरा तुझा अवतार तरी बघ.. अजून शाळेचा ड्रेस सुद्दा बदलला नाही ये तू.. साधं तोंडाला पाणी पण लावल नाहीये तू अजून.. आपल्या पासून काही खाल्लं पण नाही ये तू. जा पटकन आवरून घे आणि खायला घे काही.
" मला भूक नाही ये."
" पापांना ठीक नाही ये  आजून, आणि तुझं काय चाललय."?
बेटा पापा नेहमी तुला काय सांगता लक्षात आहे ना तुझ्या
"हो"
काय सांगतात ? 
" असं बुरशी आणि गंदु नाही राहायचं."
मग पापांनी तुला अस बघितलं तर आवडेल का त्यांना .
" हुम " नाही आवडणार.
बेटा मग जा लवकर आवरून घे.मी कधीचे तुझे कपडे  काढून ठेवले आहेत.
अनुला खूप जीवावर आले होते, तरी ती आत गेली तयारी करायला.
अणुनी पटकन सगळं आवरलं आणि ती लगेच त्यांच्या रूम मध्ये गेली..
आणि थोड्या वेळीने पुन्हा धावत -पळत माझ्या कडे आली...
" ये आऊ ये आऊ"
काय ग अनु 
ती खूप घाबरलेली आणि बैचेन दिसत होती.. तिला नीट बोलता ही येत नव्हतं मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला ..तरी ती शांत होत नव्हती..
" आऊ अग उठना लवकर ,बघ ना काय झालं आहे पापांना.
अनु काय चाललं आहे तुझं मला अजून स्वयंपाक  करायचा आहे..
" ते तू राहूदे आणि आधी चल माझ्या बरोबर "
अनु नी मला अक्षरशा खेचुन नेलं त्यांच्या खोलीत
" आऊ बघ ना पापांच अंग किती गरम लागतंय" 
मी त्यांचं अंग बघितलं तर ते खूप गरम झालेलं होतं.. मला खुप कसतरीच झालं... मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या ते उठत नव्हते.. मला त्यांची ती अवस्था बघवत नव्हती.मला नेमकं काय कराच ते काही सुचत नव्हतं.. मला कसलं भानच राहील नव्हतं ..माझा जीव एकदम गळून पडला होता....
माझी ती अवस्था बघून अनु पण रडायला लागली..
तिचा आवाज ऐकून मी जरा भानावर आले आणि स्वतःला जरा सावरण्याचा प्रयत्न केला.. आणि तिला जवळ घेतलं 
बेटा का रडतेय
" आऊ तू का रडतेय ? 
मी कुठं रडतेय
" आऊ खोटं का बोलतेय तू , तू रडत नाहीये तर तुझ्या डोळ्यात पाणी का आलं आहे ? 
माझे डोळे पण पाणावले होते याच  मला भानच राहील नव्हतं..
अनुनी पुन्हा विचार 
" आऊ काय झालं आहे पापांना ? पापा उठत का नाहीयेत ? 
मी तिला धरी दिला आणि बोलले 
काही नाही झालय पापांना.मी जरा बाजूला आली
आणि लगेच फोन केला डॉक्टरांना आणि त्यांना  सगळी हकीकत  सांगितली . डॉक्टर पण लगेच तातडीने घरी आले.. आणि त्यांना तपासायला लागले... 
डॉक्टरांना बघून अनु लगचे माझ्या मागे येऊन लपली .
त्यांना तपासता तपासता  डॉक्टर मला ते प्रश्न विचारायला लागले. 
" कधी पासून आहे ताप यांना ."?
तीन- चार दिवसा पासून ताप सारख वाटतंय असं बोलत होते मला .
"ठीक आहे " बाकी कोणतं  औषधे घेतली होती यांनी"
हो परसिटोमोल ची टॅबलेट घेतली होती.
" ओके किती वेळ झाला असेल टॅबलेट घेऊन.?'
वेळ काही नेमकं सांगता येणार नाही पण पॅरासिटीमॉल ची टॅबलेट नक्की घेतली होती त्यांनी.
" ठीक आहे असं ते बोलले आणि आपल्या बॅग मधून इंजेक्शन काढायला लागले.. ते इंजेक्शन बघून अनु खूपच घाबरून गेली होती... डॉक्टरांनी इंजेक्शन ला सुई लावली आणि यांच्या दंडात ती टोचायला लागले... तोच अनुच्या डोळ्यातू पाणी वाहायला लागलं... जणू डॉक्टर इंजेक्शन त्यांना लावत होते पण त्याच्या वेदना या अनुला होत होत्या असं वाटत होतं... मी अनुला बाहेरच्या रूम मध्ये जायला सांगितलं तरी ती शांतपणे
तिकडेच उभी होती..
इंजेक्शन देऊन डॉक्टर उठले आणि बोलायला लागले
"मी आता इंजेक्शन दिल आहे  , ताप जरा उतरेल ..पण आज खूप खबरदारी घ्यावी लागेल तुम्हाला ...आज जर ताप उतरला नाही तर यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल..
या काही गोळ्या मी लिहून देत आहे त्या तातडीने घेऊन या..
आणि डॉक्टर निघून गेले..
मी अनु सांगितलं तू पापांन कडे थांब मी पटकन औषधे  घेऊन येते मेडिकल मधून,  आणि मी तशीच घाई घाई ने मेडिकल मध्ये जायला निघाले.. तोच मागून मला अनुचा आवाज आला
" आऊ ये आऊ" 
काय ग अनु ? मला वेळ होतोय, बाबांची औषधे आणायला चालली आहेत ना मी .
अनुने मला इशाऱ्याने दारा जवळ बोलवल.. मला कळेच ना की अनु मला का बोलावतेय.
मी जवळ गेल्यावर तिने डॉक्टरांनी दिलेली औषधांची चिट्टी माझ्या हातात दिल आणि परत घरात निघून गेली..
मी घाई घाईत ती चिठ्ठी घरीच विसरून चालली होती.. मी एकदम धावत- पळतच मेडिकल मध्ये गेली पण त्या चिठ्ठीत लिहलेली एक टॅबलेट त्या जवळच्या मेडिकल मध्ये नव्हती, म्हणून मला मार्केट मध्ये मोठं मेडिकल आहे तिकडे जावं लागलं..मला बराच वेळ लागला घरी यायला...
मी घरी आले तर पाहते तर काय अनु ही त्यांच्या उशाशी बसली होती आणि त्यांच्या कपाळावर ओल्या थंड रुमालाच्या पट्टया ठेवत होती... मी क्षणभर तिच्या कडे बघतच राहिले. मी तिला पाहून खूप भारावून गेले होते..खूप अभिमान वाटत होता मला तिचा .. एवढं सगळं कसं बाई सुचलं असेल या लहानश्या जीवाला . मला काहीच कळत नव्हतं..मी जवळ गेले तिच्या आणि तिला गच्च मिठी मारली 
" आऊ कितीग वेळ लावला तू यायला ? 
 हो ग अनु ते औषध भेटतच नव्हतं म म्हणून वेळ लागला मला यायला 
" ठीक आहे " 
अनु तू हे काय करते? 
" आग आऊ मागे बघ मी एकदा आजारी पडली होती तर पापा पण असेच ओला रुमाल माझ्या कपाळावर ठेवत होतें.." मग मी पटकन बारी पण झालेली ना?
हो.. 
" म्हणून मी तेच करतेय... हा आणि मी माझा माझा रुमाल घेतलं आहे.. तुझा सडू रुमाल नाही घेतलाय...
किती गुणी आहे बाळ माझं 
आमचा आवाज ऐकून हे आता शुद्धीवर आले... त्यांना शुद्धीत आलेलं पाहून  माझा जीवात जीव आला..त्यांना उठेलल पाहून अनुने लगेच मला दूर केलं आणि त्यांना जाऊन बिलगली... त्यांच्या आता बऱ्याच गप्पा चालल्या होत्या.. त्यांची तब्बेत आता  जरा ठीक वाटत होती..
मी स्वयंपाक आवरायला मग किचन मधे गेली...पटापट सगळ आवरलं. आणि अनुला जेवायला बोलावलं.
" आधी पापांना दे जेवायला, मगच मी खाईल."
बेटा आपल्या पासून तू काही खाल्लं नाहीये आधी खाऊन घे तू जरा मी देते नंतर पापांना जेवायला. 
पण अनु माझं काही ऐकतच नव्हती..  शेवटी मी उठले आणि यांना जेवायला दिल... यांचं जेवण झालं की त्यांना औषधे दिली आणि पुन्हा झोपवल .. मी अनुला शोधायला हॉल मध्ये आली तर अनुने आधीच आमच्या जेवणाची ताट लावली होती..
मी तिच्या जवळ गेली तिने मला ताट वाढून दिल... आज पर्यंत अनुने कधी स्वतःहून जेवणच ताट देखील  घेतलं नव्हतं पण आज चक्क ती स्वतःच्या हाताने जेवण घेऊन खात होती आणि तिने मला पण जेवायला वाढलं होत... 
मी तिला घास भरवायला हात पुढे केला, तर ती बोलली 
" आऊ तू पण काही खाल्लं नाहीये दिवसभर खाऊन घे तू आधी. माझं माझं मी खातेय ना."
अनु खूप वेगळी वाटत होती मला मी ज्या अनुला ओळखते ती ही नक्कीच नाही अस मला वाटायला लागलं होतं . तिच्यातला हा बदल मला खूप बैचेन करत होता. अधीर करत होता.
 जेवण झाल्यावर तिने स्वतःच ताट उचलून किचन मधे नेलं आणि घासायला लागली. तर मी तिला बोलली.
" बेटा तू खूप थकली आहेस... जा झोपून घे..
"मी काम करतेय ना..
बेटा जा ना किती वेळ झाला आहे 
अनु काही ऐकतच नव्हती माझं शेवटी मी तिला बोलली की जा पापांना काय हवं आहे का बघून ये तेव्हा कुठे ती गेली. मी पटापट काम आवरून घेतली. आता रात्रीचे सडे अकरा वाजले होते.. मी माझं शाळेचं काम करायला घेलत दिवसभराच्या गडबडीत मला काहीच काम करत आलं कम नव्हतं.. मला उद्याच्या उद्या ते शाळेत जमा करायचं होतं...
अनु ही आता यांच्या कुशीत झोपून गेली होती......मी काम करायला हॉल मधे आली..
काम करत करता मला  कधी झोप लागली हे मला कळलंच नाही.... नंतर बऱ्याच वेळाने मला अचानक जाग आली सकाळचे सडे तीन वाजले होते... पाहते तर काय माझ्या अंगावर कोणीतरी चादर पांघरवली होती.. मला खूप आचार्य वाटलं की कोणी मला चादर पांघरवली होती  यांची तर तब्बेत ठीक नव्हती ना.. मी यांना आणि अनुला पाहायला यांच्या रूम मधे गेली तर पहाते तर काय.. अनु आता देखील त्यांच्या उशाशी बसली होती.... यांच्या कपाळावर त्या थंड पाण्याच्या रुमलाच्या पट्टया ठेवत..

Tuesday, 14 April 2020

शेवटची आठवण ( कथा )

            आमच्या कळंबोली मध्ये एक तळ आहे.  मला कधी मोकळा वेळ भेटला की मी तिकडे जाऊन बसतो. खूप शांत आणि मनाला प्रसन्न करणार वातावरण असते तिकडे. वाऱ्याचा झुळ झुळ करणारा आवाज ,पक्षांची किलबिल  आणि माशांचा पाण्यात हलकेच सूर मारल्याचा आवाज  मनाला एका वेगळ्या प्रकारच्या शांतीचा अनुभव करून देत असते. दिवसभराच सार टेन्शन ,सारा थकवा एक क्षणात निघून जातो .
               तळ्याच्या समोर एक छानसा कट्टा आहे, मी नेहेमी  त्या काट्यावर जाऊन बसतो . माझी कित्येक सुख- दुःख त्या कट्ट्याने खूप जवळून पहिली आहेत. माझ्या आनंदाच्या प्रत्येक क्षणाचा तो वाटेकरी आहे ,सोबती आहे. खुप काही आठवणी आहे.माझ्या त्या कट्ट्या सोबत कधी भावनांच्या सागरने आपलं उर भरून आलं की आपल्याला मोकळं होण्यासाठी एक तर हक्काचा असा माणूस तरी लागतो नाहीतर हक्काची अशी जागा तरी  लागते जिथे आपल्याला मनसोक्त हसता येत ,मनसोक्त रडता येत, मोकळं होता येत.आज पुन्हा मी त्या कट्टयावर जाऊन बसलो. पुन्हा तो वाऱ्याचा झुळ झुळ करणारा आवाज येत होता , पक्षांची किलबिल ऐकू येत होती, मला खूप छान वाटत होतं. मी तळ्याकडे कडे एकटक बघत बसलो होतो.तळ्यात माशांचे ते हलकेच सूर मारणं आणि त्याचा तो आवाज आणि त्याच्या मुळे पाण्यावर उठणारे ते तरंग मी  गुंतत जात होतो. त्या वातावरणात मनाला एक प्रकारची समाधी लागल्याचा अनुभव  होत होता.
                तेवढ्यात तिकडे एक गृहस्थ आले आणि मनाला सुखावणाऱ्या त्या शांततेचा भंग झाला.त्यांचे ते विस्कटलेले केस, अस्थवेस्थ असे कपडे, डोळ्यात घातलेला जाड्या भिंगाचा अर्धवट तुटलेला तो चष्मा खांद्यावर लटकवलेली ती कापडाची मळलेली पिशवी एकदम अजबच त्यांचा अवतार वाटत होता. काही वेळ ते शांत बसले आणि आपल्या पिशवीत काही तरी शोधायला लागले.. आणि खूप बैचेन झाले. बऱ्याच वेळ ते काही तरी शोधत होते.
मला त्यांची ती अवस्था बघवत नव्हती पण बोलायचं कसं हा प्रश्न पडला होता. शेवटी मला राहवलं नाही आणि मी बोललो
'काका काय झालं ?'
' काय शोधताय तुम्ही? काही हरवलं आहे का ?
आपल्या तुटलेल्या चष्म्याला एका हाताने सावरत त्यांनी माझ्या कडे पाहिलं काही वेळ शांत राहीले आणि होकारार्थी मान हलवली त्यांनी...त्या तुटलेल्या चष्म्या मागचे ओलावलेले डोळे आता मला स्पष्ट दिसत होते..काय करावं हे मला आता समजत नव्हतं.. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो.. त्यांचे पाणावलेले डोळे आता  गच्च भरून वाहत होते.. मला राहवलं नाही मी विचारलं
' काका काय झालं आहे ? असं नेमकं काही महत्वाचं  हरवलं का , की काही पैसे वैगरे हरवले.? 
गच्च भरून वाहणाऱ्या आपल्या आसवांना त्यांनी शर्टाच्या बाहुणे पुसले... गहिवरलेल्या आवाजात ते बोलले
" आज तिची शेवटची आठवण ही माझ्या कडून हरवली" 
मला काही कळेचं ना.. काय करायचं ते
 ते अचानक उठले.. सैरावैरा इकडे तिकडे फिरू लागले ,वेड्या सारखे एक एक दगड, एक एक वीट उचलून पाहू लागले.. ज्या वाटेवरून ते आले होते त्या वाटेवर पुन्हा ते निघाले एक एक कोपरा चाचपडून  पाहू लागले. मी ही त्यांच्या मागे मागे चालायला लागलो. बराच वेळ आम्ही फिरत होतो तरी काकांना ती वस्तू भेटली नाही. शेवटी हताश होऊन ते रस्त्यावर एका कोपऱ्यावर बसेल आणि पुन्हा त्यांनी हंबरडा फोडला. त्यांची ती अवस्था बघून मला देखील गहिवरून आलं आणि मी देखील त्यांच्या जवळ जाऊन बसलो.. मी पुन्हा विचारलं 
काका नेमकं काय शोधत होता.. ?
   गहिवरलेल्या आवाजात ते बोलले
"सरू चा फोटो.." 
काका सरू कोण ?  
"बेटा! अर्धांगिनी होती माझी , सरिता नाव होतं तीच ,लाडाने सरू अशी हाक मारायचो मी तिला लग्ना आधी मुलीचा फोटो पाठवतात ना म्हणून तो फोटो तिच्या घरच्यांनी मला पाठवला होता.  सरू  देवा घरी गेल्या  पासून एकदम काळजाशी जपून ठेवला होता पण आज तो ही माझ्या पासून दूर गेला जशी  सरू कायमची दूर गेली तशी.  
                     मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना जरा धीर देण्याचा प्रयत्न केला त्यांना.. काका नियती आहे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला पुन्हा जग सोडून जावंच लागत. प्रत्येकाचा एक ठराविक  वेळ हा विध्यात्याने लिहलेला असतो . एका वेळे नंतर स्वतःला मोहपाषातून वेगळं करावंच  लागत आपल्याला. माझं ते बोलणं ऐकून काका मिश्किल पणे हसले आणि बोलले 'बेटा तुझं बोलणं हे अगदी बरोबर आहे... पण एखादी व्यक्ती जर आपलं आयुष्यच बनून गेलेलं असेल तर काय करायचं? 
आपला श्वास बनून गेलं असेल तर काय करायचं ? आपला  प्राण बनून गेलं असेल तर काय करायचं?
अरे जगण्या साठी आपल्याला फक्त श्वासांची गरज नसते रे.! आपल्या खरी गरज असते ती आपल्या माणसांची 
काका आवेगात बोलत होते पण मी शांत पणे सगळं ऐकत होतो.
काका नेमकं काय झालं होतं ,काकी कधी गेल्या ? 
'काकांनी श्वास सोडला आणि बोलले आज चार वर्षे झाली सरूला जाऊन.'
काका नेमकं काय झालं होतं काकांनी ? 
'ब्लड कॅन्सर झाला होता.' 
माझ्या काळजाचा ठोका हा अचानक चुकल्या सारख झालं मला..
 कोण होती ती सरू आणि कोण आहेत हे काका तरी सरू बद्दल ऐकल्यावर  जीवाला चटका लागून गेला.
मी आता एकदम शांत झालो होतो काका एकटक माझ्या कडे बघत होते. थोडा वेळ आमच्यात काहीच संवाद झाला नाही..
मग काकांनीच बोलण्याची सुरुवात केली..
                  मी लहान असतानाच माझे आई वडील वारले, माझा सांभाळ नंतर काकांनी काकीनी केला . आई बाबांची माया लावली पण नियतीला काही औरच मंजूर होत..एका दुर्घटनेत काका वारेल पूर्ण घरावर दुःख डोंगर कोसळल.घरची आर्थिक परिस्थिती ही खूप ढासाळली. काकींची अवस्था मला बघवत नव्हती . घराला हातभार म्हणून मी काम करायचं ठरवलं. मिळेल ते पडेल ते काम केलं.. पण माय माऊली ती .. माझं शिक्षणावर दुर्लक्ष होतंय म्हणून काकींनी मला मुंबई ला सरकारी बोर्डिंग मधे पाठवलं. मला मुंबई ला पाठवण्या साठी त्या माऊलीने काय कष्ट घेतले असतील कोण जाणो...
काका ओघा ओघाने बोलत होते आणि मी शांत पण सगळं ऐकत होतो. 
'आणि पुढे मुंबई ला आलो जीव लावून अभ्यास केला शिक्षण पूर्ण केलं  आणि लगेच कामाला लागलो माऊलीच्या कष्टच फळ करायचं होतं मला आता ठरवलं की बस झालं आता आपण जरा कमावतो झालो आहोत काकीला घेऊन यायचं आता इकडे मुंबई ला तिला आणण्या साठी मी गावाला गेलो तर ती मला बोलली की माझं आयुष्य गेलं इकडे आता जीव गेल्या शिवाय  या घरातून पाय निघणार नाही..
मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला तिला तरी ती काही ऐकली नाही ...
मी पुन्हा  मुंबई ला वापस आलो....आणि असेच काही दिवस गेले..आणि एका दिवशी काकींची अचानक तार आली मला, की "एकदम तातडीने गावाला निघून ये.. "
मला सुचत नव्हतं की नक्की काय झालं असेल मी तसाच गावाला निघालो..
घरी पोहोचलो तर काकी शांत पण खाटेवर बसलेली होती आणि तिच्या हातात तो सरू चा फोटो होता..
तिने तो फोटो माझ्या हातात दिला आणि बोलली की ही सरिता. आंबे-वाडीतले देशमुख आहेत ना त्यांची पोरगी. तुझ्यासाठी ही मी पसंत केली आहे . तुझी काही हरकत आहे का याला ? ..मी काही काकांच्या शब्दा बाहेर नव्हतो मी होकार देऊन टाकला .
सरूचा फोटो तेंव्हा मला नीट पहात देखील आला नव्हता. सगळं कसं नंतर खूप पटापट झालं. जवळचा मुहूर्त धरला होता. अगदी साध्या पध्दतीने लग्न सोहळा पार पडला.
सरू ला पहिल्यांदा मी तेव्हा निरखून बघितल होत....
तिच्या गालावरची ती केसांची बट, तिच्या चेहऱ्यावर पडणारी ती नाजूक खळी.. तिचे ते बोलके डोळे, तिच्या ओठांच्या बरोबर वर उजवीकडे एक नाजूक तीळ. तिचा तो गोड मंजुळ आवाज...
काका एका वेगळ्याच दुनियेत गेले आहेत असं मला वाटाय लागलं... सरू काकींन बद्दल बोलतांना एक वेगळंच तेज त्यांचा चेहऱ्यावर दिसत होतं..
काका मध्येच हसले.. आणि बोलले अरे मला आधी तिच्याशी बोलताना ही खूप भीती वाटायची.. ती एवढी छान सुंदर गोंडस आणि मी हा असा गबाळ्या सारखा. काका काही वेळ त्या गुलाबी आठवणीत हरवून गेले.. मी मुद्दामून खोकल्याचा आवाज केला आणि त्यांच्या त्या समाधीचा भंग झाला, आणि काका पुढे बोलायला लागले..काय जादू होती सरू मध्ये कोण जाणे मी एवढा वेळ काकीला समजावलं होत की तू आता मुंबई ला ये  राहायला पण ती आली नाही, पण सरू एकदाच बोलली तिच्याशी आणि काकी मुंबईला आली राहायला... 
गुण्यागोविंदाचा संसार सुरू झाला होता आमचा.. बोलता बोलता दोन वर्षे निघून गेले .. सरू ला दिवस गेले.. आम्ही खूप आनंदात होतो,  नवीन पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहत होतो खूप.. पण सात महिने झाले तरी बाळाची पाहिजे तशी हालचाल जाणवत नव्हती.. त्या काळी सोनोग्राफी ही आजच्या सारखी प्रचलित नव्हती.. सरू ची डिलिव्हरी झाली ती सुखरूप होती पण बाळ जगलं नाही... सरूला तो धक्का सहन झाला नाही , सरू पूर्ण पणे तुटून गेली होती तेव्हा. 
सरू ची ती अवस्था मला बघवत नव्हती तेव्हा...मी ही आतून तुटून गेलो होतो पण मला सरू ला सावरायच होत.. आम्हाला या धक्क्यातून बाहेर यायला खूप वेळ लागला . सरू देखील आता जरा सावरली होती.. तेव्हाच एक शुल्लक आशा आजाराचं कारण झालं आणि काकी त्या आजारात गेली.. काकी गेली तो धक्का खूप मोठा होता माझ्यासाठी माऊली चा पदर पुन्हा माझ्या डोक्यावरून हरवला होता.. सरू ने खूप जिकरीचे मला सावरलं तेव्हा.. सरू कधी सखी झाली माझी तर कधी माय माऊली झाली माझी... 
   नंतर बराच प्रयत्न करून ही सरूला गर्भ राहिला नाही तेव्हा ही ऐश्वराचीच इच्छा आहे असं मानलं आम्ही.. आता फक्त एकमेकांसाठी जगायचं.. हे ठरवलं आम्ही.
आम्ही जणू  एक जीव झालो होतो.. सरू श्वास जीव प्राण झाली होती.. तीची सवय नाही तर तिची सोबत ही गरज झाली होती माझी.. 
जीवनात नंतर ही खूप चढ उतार आले पण सरू खंबीर पणे सोबत उभी राहीली होती माझ्या..
असेच काही वर्ष गेले .. 
सरू अचानक आजारी पडायला लागली.. तीच वजन हे पटापट कमी व्हायला लागलं.. मी तसाच तिला हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट केलं.. 
तिला कॅन्सर झाला आहे असं निदान डॉक्टरांनी केलं.
माझ्या पाया खालची जमीन सरकली..
सरू आता एकमात्र जगण्याचा सहारा उरला होता माझ्या आयुष्यात.
काकांचे डोळे पुन्हा भरून आले.. पुन्हा ते गहिवरून गेले...
मी जरा शांत केलं त्यांना
 काका पुढे बोलले 
' मी खूप लढलो ,खूप पर्यत केला, होत नव्हतं ते सगळं पणाला लावल पण सरूला नाही वाचू शकलो मी आणि काकांचा पुन्हा तोल गेला. मी कस बस त्यांना सावरलं..
काका पुढे बरच काही बोलत होते आणि मी फक्त ऐकत होतो..
बराच वेळ आम्ही बसलो होतो तिकडे.. आता अंधार देखील पडायला लागला होता. आम्ही आता जायला निघालो . मी काकांना बोललो की काका तुम्हाला सोडायला येऊ का मी ? आता खूप वेळ देखील झाला आहे..
काका प्रेमाने बोलले "नको बेटा तुला देखील वेळ झाला असेल, आता तू देखील घरी जा  माझी काळजी करू नकोस मी जाईल बरोबर घरी...."
 ठीक आहे असं म्हणत मी काकांचा निरोप घेतला आणि घरच्या दिशेने निघालो... 
खूप काही चाललं होतं तेव्हा माझ्या मनात एकदम साध्या साध्या प्रॉब्लेम ने आपण किती बेचैन होऊन जातो पण लोकांच्या आयुष्यात किती दुःख असतात. त्यांच्या दुःखा समोर आपलं दुःख तर कवडी मोल पण नाही.
                      आता पूर्ण अंधार पडला होता.. तरी मी त्या तळ्याकडे गेलो....आणि पुन्हा त्या कट्टयावर जावून बसलो.
 आतून खूप बेचैन वाटत होतं. मला काही सुचत नव्हतं, वातावरनातं एक उदासी  जाणवत होते.
तेवढयात वाऱ्याची एक झुळूक आली.. आणि एक जाडसर कागद माझ्या पाय जवळ येऊन पडला.. माझी सवय आहे की कोणताही कागद मी माझ्या पायाखाली येऊ देत नाही, म्हणून  मी तो कागद उचलून बाजूला करण्यासाठी हातात घेतला .  तो एक फोटो होता. मी रस्त्या वरच्या दिव्याच्या उजेडात तो फोटो घेऊन गेलो तर तो  एका सोळा सतरा वर्षांच्या मुलीचा ब्लॅक अँड वाईट फोटो होता.. गालावर आलेली ती केसांची बट, चेहऱ्यावर पडलेली तो गोड खळी आणि ओठांच्या वर अगदी उजव्या बाजूंला तो नाजूकसा तीळ... अरे हा तर सरू काकींचा फोटो असावा.... मी धावत पळत तसाच काका बसले होते त्या जागेवर गेलो .. पण काका आता तिकडे नव्हते मी त्यांना पुढे बराच शोधण्याचा प्रयत्न केला पण काका मला दिसलेच नाही... माझ्या समोर एक गृहस्थ आले त्यांनी मी विचारलं की असा असा दिसणारा सुमारे  या या वायाचा माणूस इकडे जवळ पास राहतो का... तर त्यावर ते गृहस्थ बोलले की अस कसं सांगता येईल त्यांचं नाव तरी माहिती असायला हवं पाहिजे होत की नाही.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की एवढा वेळ आपण काकांन सोबत  बोलत बसलो होतो तरी  त्याचं नावच विचारलं नाही.. की ते कुठे राहतात हे देखील विचारलं नाही
मी डोक्याला हात लावला , माझा मूर्ख पणा  लक्षात आला होता मला..
मी आज देखील तो फोटो घेऊन रोज जातो त्या तळ्या कडे, की ते  काका मला पुन्हा भेटतील या आशेने त्यांना त्यांची  हरवलेली सरू  पुन्हा वापस देण्यासाठी..  सतिष अहिरे

Saturday, 14 March 2020

एकांताचं स्वगत

तसा प्रमोद दादाला मी बऱ्याच दिवसांपासून ओळखतो . पनवेल येथील जेष्ठ गजलकार आणि आमचे गुरू श्री ए के शेख याच्या कडून बऱ्याच वेळा मी प्रमोद दादांचं नाव ऐकलं होतं . पनवेल ला एका कार्यक्रमाला प्रमोद दादा आला होता तेव्हा पहिल्यांदा आमची भेट झाली होती.तेव्हा काही  मोजकच बोलणं झालं होतं,नंतर हळू हळू संपर्क वाढला पण प्रमोद दादा मला खरा  कळायला लागला तो  त्याच्या पुस्तकातून तेव्हा त्याचा नुकताच 'समतोल 'हा गजल संग्रह प्रकाशीत झाला होता. तो जसा आहे ,तो जसा वागतो, तो जसा बोलतो, तो जसा राहतो, अगदी तसंच  त्याच लिखाण आहे. एकदम अलवार ,हळुवार काळजाला स्पर्श करणारं एकदम हळव्या मनाचा संवेदनशील असा हा प्रमोद आहे.हा आणि एक गोष्ट प्रमोद दादा बद्दल  तो खूप प्रामाणिक आहे. त्याच्या लेखनिशी कोणताही खोटे पणा त्याच्या लिखाणात नाही कोणताही फुकटचा बनाव त्याच्या लिखाणात नाही  . त्याने जे सोसलं आहे त्याने जे भोगलं ते तसच्या तसं त्याने आपल्या कवितेत आणि गजलेत उतरवलं आहे.  
      आता मागच्याच महिन्यात ९ फेब्रुवारीला प्रमोद दादाच्या  'एकांताचं 
स्वगत' या पुस्तकाचं  प्रकाशन झालं. खूप सुंदर झाला होता सोहळा.मला घरी परततांना पण  बराच उशीर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी पण कामाची खूप गडबड होती बघता बघता आठवडा असाच गेला पण पुस्तकाचे  काही  वाचन झालं नाही. 
         मग रविवार आला माझी बाकी सगळी उरली सुरलेली कामे करण्यात दिवस निघून गेला. आणि रात्री काही ११.३० सुमारास मी प्रमोद दादाचं एकांताचं स्वगत हे पुस्तक वाचायला घेतलं. आणि सकाळी ४.३० की ५ पर्यत मी ते पुस्तक वाचतच राहिलो. पुन्हा जरा वेळ झोपलो आणि पुन्हा ते पुस्तक वाचायला घेतलं.. काल रात्री वाचलं तरी मनच भरलं नव्हत माझं.  पुस्तक वाचताना प्रमोद दादाने मांडलेला एक एक प्रसंग जणू जिवंत होत होता डोळ्या समोर.. कितीतरी जुन्या जखाम पुन्हा नव्याने जाग्या झाल्या. किती तरी घाव पुन्हा नव्याने ओले झाले.. प्रमोद दादाने खूप हसवल खूप रडवल. वेड केलं.
        व पु काळे यांचं पुस्तक वाचताना कसा आपल्या अंगावर काटा येतो ,जीवाला चटका लागून जातो तसच काही प्रमोद दादाच एकांताचं स्वगत हे पुस्तक वाचताना होतं. एक एक कविता ही मनाला चटका लावून जाते खूप , किती साध्या सरळ आणि  सोप्या शब्दात प्रमोद दादा खूप काही बोलून जातो. एखादा परीस कसा असतो त्याला कसला स्पर्श झाला की त्याच तो सोन करून टाकतो अगदी तसच प्रमोद दादा जे काही लिहतो त्याच सोन करून टाकतो.
           मनात अजून खूप काही साचलं आहे. हे सांगावं व की नेमकं ते सांगावं मला कळत नाहीये. एक नक्की सांगतो मी प्रत्येकाच्या संग्रही असाव असं हे पुस्तक आहे. तर मित्रांनो हे पुस्तक विकत घ्या आणि आपल्या  प्रेमाच्या माणसांना नक्की हे पुस्तक भेट द्या..  आयुष्यातली सगळ्यात सुंदर अशी भेट असेल ती त्यांच्यासाठी......
           आणि प्रमोद दादाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...     सतिष अहिरे

Tuesday, 7 January 2020

थंडी

आजची चारोळी नक्की बघा मित्रानो .