आज संत शिरोमणी श्री संत रोहिदास यांची जयंती आहे त्यांचा जन्म इ.स.१४१४ साली माघ माघपौर्णिमेला रविवारी झाला होता . म्हणून आज त्यांचा एक दोहा आपल्या समोर सादर करत आहे
एकै माटी के सब भांडे सबका एको सिरजन हारा ।
' रविदास ' ब्यापै एको घट भीतर, सबकौ एकै घडै कुम्हारा।१
या वरील ओळीत संत श्रेष्ठ श्री. संत रोहिदास म्हणतात की , ज्या प्रमाणे कुंभार एकाच मातीतून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक भांडे तयार करतो त्याच प्रमाणे ईश्वराने एकाच मातीतून आपल्या सगळ्यांना घडविले आहे .प्राणी, पक्षी ,माणसे ,धरती निसर्ग सागर याचा निर्मात हा एक दयाळू ईश्वरच आहे आणि तो या सर्वांमधे व्यापला आहे .
सतिष अहिरे