Thursday, 19 June 2025

मनाचा एक रिकामा कप्पा


   डॉक्टर अविनाश पाटील हे फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांचं साहित्य विश्वातील कार्य हे फार मोठे आहे. आगरी बोली भाषेवरती त्यांचा पीएचडीचा प्रबंध देखील प्रकाशित झालेला आहे. साहित्यातील जवळपास सर्वच प्रकार त्यांनी एकदम प्रभावीपणे हाताळले आहेत आणि आता ते

माणसाने माणसाला ओळखावे 
देव तेथे भेटतो हे संतवाणी 

असा मानवतावादी आणि सकारात्मक विचार घेऊन   'मनाचा एक रिकामा कप्पा' हा त्यांचा दुसरा गझल संग्रह आपल्या  भेटीला घेऊन आलेले आहेत.

 त्यांनी आपला हा गजलसंग्रह  त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार  श्री गजानन परब यांना समर्पित केलेला आहे.  या गजल संग्रहाला  ज्येष्ठ गझलकार मा. श्री  अॆ. के. शेख सरांची खूप समर्पक अशी प्रस्तावना लाभलेली आहे. संजय शिंदे यांच्या अष्टगंध प्रकाशाला मार्फत हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे तसेच संतोष घोंगडे यांनी फार सुरेख असा मुखपृष्ठ या पुस्तकासाठी तयार केलेल्या आहे.

गजल ही काळजाची भाषा आहे. गजल ही हळव्या भावनांचे कवी मनावर झालेले गोंदण आहे .गजल अलवार पावलांनी शायराच्या काळजात शिरकाव करते आणि त्याला चूर चूर करते , घायाळ करते.. ते अस
डॉ. अविनाश पाटील यांचा हा शेर बघा.

प्रेमामध्ये असते गोडी ते फुलल्यावर 
काट्यांची ही मखमल होते तू दिसल्यावर

क्या बात है अविनाश सर
सखीच्या विरहात झुरत असलेल्या शायराला आता कशाचाच आधार वाटत नाही. सखीच्या विरह वेदनेत त्याचा जीव जळत असतो, तळमळत असतो.  सखीची ती विरह वेदना त्याच्या काळजाला जाळत असते ,घायाळ करत असते, काट्या सारखी बोचत असते,आणि अचानक सखी समोर येते मग शायराला सगळ्या जगाचा विसर पडतो. सखीच्या विरहाने वाळवंटासारख होरपळून गेलेलं  त्याचं मन गुलाबी मखमली भावनांनी बहरून जात.. 


डॉ. अविनाश पाटील हे हळव्या मनाचे शायर आहेत. आणि त्यांची गजल ही त्यांच्या हळव्या मनाचं दर्पण आहे. 
सखीभेटली की सखीशी खूप काही बोलायचं असतं सखीला  खूप काही  सांगायचं असतं. पण सखीला पाहताच शब्द ओढतच अडखळतात. मनाच्या वेदना, सोडलेल्या यातना काही - काही सखीशी बोलता येत नाही आणि मग मनाची खूप घुसमट होते. श्वास कोंडायला लागतो.
त्यांचे हे शेर बघा.  

सांजवेळी मी तुझ्याशी बोलणे राहून गेले 
भावभोळे दाटलेले समजणे राहून गेले 

ते तुझे आतुर होणे जीव जीवा लावणे ते 
मोगऱ्याच्या या फुलांचे बहरने राहून गेले 

का नशिबाने करावी क्रूर थट्टा आपली ही 
 विझुन गेलेल्या मनाचे पेटणे राहून गेले.

परिस्थितीमुळे तर कधी समाजामुळे दोन जीवांची ताटतूट होते. जीवाचा जीव असलेली सखी एका क्षणात परकी होते. मागे फक्त उरते ती फक्त तिची आठवण.आणि तिच्या आठवणीने तळमळणाऱ्या काळजातून एक आवाज निघतो तो हा असा .
हे शेर बघा

आठवांना आवराया लागलो
मी मलाही सावराया लागलो

मी फुलांना भेटलो नाही कधी ही
काढले आयुष मी काट्यात माझे

पाऊस ओळखीचा बरसून आज गेला
डोळ्यात आसवांना सजवून आज गेला




आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेमुळे मनुष्य हा आत्मकेंद्री बनत चाललेला आहे. त्यांच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण होत चालली आहे , दुरावा निर्माण होत चाललेला आहे. नात्यांमधील भावनांची जागा आता व्यवहाराणे घेतली आहे, या समाजवेवस्थतचे सजीव चित्रण आपल्याला डॉ. अविनाश पाटील यांच्या गजलेत पाहायला मिळते. त्यांचे हे शेर बघा.


 
विभागून गेला असा सातबारा
 कचेरीत देतो किती मी पुरावे 

घरात केव्हा बेघर झालो कळले नाही 
अन् एकटा कधी मी उरलो कळले नाही


डॉक्टर अविनाश पाटील यांची गजल केवळ कल्पना विश्वात रमत नाही तर वास्तवाचं जिवंत चित्रण आपल्याला त्यांच्या गजलेत पाह्यला मिळत. आजही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील कित्येक शेतकरी आपल्या माथ्यावरील कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलत आहते, तरी देखील त्यांच्या मृत्यूची साधी दखल सरकार कडून घेतली जात 
नाही. सर्व जगाचा जो अन्नदाता आहे जो पोषण दाता आहे त्याचं सरकारी व्यवस्थांपासून  होणाऱ्या शोषणाला वाच्य फोडण्याचे काम त्यांनी आपल्या या शेरात किती प्रभावीपणे केलेला आहे.

पोसतो साऱ्या जगाला अन्नदाता 
बातमी कोठे त्याच्या शोषणाची 


शेतकरी मोठ्या आशेने एका चातकासारखी ओल्या डोळ्यांनी पावसाचे आतुरतेने वाट पाहत असतो, तेव्हा पावसाचा एक साधा थेंबही पडत नाही. 
आणि जेव्हा तो पडतो तेव्हा असा पडतो की सगळा संसार वाहून नेतो.
त्यांचे हे शेर बघा

संसार ओस झाला मातीत जीव गेले
सारेच आज नेले शेजार पावसाने 

ओसाड शेत झाले काडी कुठे दिसेना
डोळ्यात पूर दाटे बेजार पावसाने

जेव्हा कोरोनाच्या महामारीने पूर्ण जग व्यापलेला होतं. तेव्हा माणसांची खरे रूप आपल्याला दिसायला लागलं स्वतःच्या नात्यातली माणसं एकमेकांना संशयाच्या  नजरेने बघायला लागली होती एक मेकांना जाणीव पूर्वक टाळायला लागली होती पण अशावेळी हळव्या मनाचे भावना प्रधान कवी डॉ.अविनाश पाटील हे बोलून जातात. 


ही बहाणे सांगण्याची वेळ नाही
माणसांना टाळण्याची वेळ नाही


जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टीला सामोरे जायला लागतं बऱ्याच वेळा उपेक्षा सहन करावी लागते. तरीही मनाचा तोल  सावरून येणाऱ्या प्रसंगाला संकटाना निधड्या छातीने  सामोरे जावे लागते.
डॉ अविनाश पाटील यांचे पुढील शेर बघा

भरारी घेतली आहे नव्याने
जरी नाकारले होते नभाने

वही जिंदगी वाया गेली 
कुठे स्वीकारले होते जगाने 

 

कवीचे मन हे मुळात फार हळवे असतं आजूबाजूच्या परिसराचा आणि  घटनांचा त्याच्या मनावर खूप  खोलवर परिणाम होत असतो. आजूबाजूच्या विदारक घटनांना बघून कधी त्याचा मन कष्टी होतं तर कधी त्याचं मन घायाळ होतं. आणि त्या घायाळ झालेल्या मनातून एक आक्रोश बाहेर पडतो.. तो असा 

भाकरीचा चांद शोधा या निघालो 
शहराचा व्यापलेले झोपड्यांनी

काम द्यावे लागते येथे भुकेला 
फार झाला भाषणांचा गोषवारा 
 

तुझ्या जिंदगीची आता प्रयत्न काय कमाई आहे असे या कलंदर शायराला विचारतात त्याचं  हे उत्तर असतं.

जीवनाची ही कमाई 
फार जपतो बाप आई

डॉक्टर अविनाश पाटील यांच्या वरती , त्यांचा साहित्यावरती त्यांच्या ,कवितांवरती बरंच काही बोलण्यासारखे आहे पण येथे शब्दांची मर्यादा आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मराठी साहित्य क्षेत्राच्या कक्षा डॉ. अविनाश पाटील यांच्या साहित्याने नक्कीच रुंदवणार आहेत. तूर्तास येथेच थांबतो धन्यवाद. 
  ( सतिष अहिरे )


Wednesday, 14 September 2022

GAZAL SAKHICHI EPISODE 12

https://youtu.be/ybKsOT4uN2w
मित्रांनो कधी कधी काळजावर एक घाव खूप खोलवर होतो ,  खूप गहिरा होतो  आणि  त्या घायाळ काळजातून वेदना  पाझरू  लागते .  
कधी कधी  ती मखमली वेदना असते 
तर कधी कधी  ती जीव  जळणारी घोर  यातना  असते .
मित्रांनो गझल म्हणजेच  मखमली वेदना 
मित्रांनो गझल म्हणजेच  विरहात सोसलेल्या यातना .
Dear friends kindly like share and subscribe my you tube channel

Wednesday, 16 February 2022

संत रोहिदास


आज संत शिरोमणी श्री संत रोहिदास यांची जयंती आहे त्यांचा  जन्म  इ.स.१४१४ साली माघ माघपौर्णिमेला रविवारी झाला होता . म्हणून आज त्यांचा एक दोहा आपल्या समोर सादर करत आहे 

एकै माटी के सब भांडे सबका एको सिरजन हारा ।
' रविदास ' ब्यापै एको घट भीतर, सबकौ एकै घडै कुम्हारा।१

या वरील ओळीत संत श्रेष्ठ श्री. संत रोहिदास म्हणतात की , ज्या प्रमाणे कुंभार एकाच मातीतून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक भांडे तयार करतो त्याच प्रमाणे  ईश्वराने एकाच मातीतून आपल्या सगळ्यांना घडविले आहे .प्राणी, पक्षी ,माणसे ,धरती निसर्ग सागर  याचा निर्मात हा एक दयाळू ईश्वरच आहे आणि तो या सर्वांमधे व्यापला आहे . 
                                                         सतिष अहिरे

Friday, 28 January 2022

चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे


चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; -
 नाशिक मध्ये गोदावरीच्या तीरी तील भंडारेश्वर महादेवा शेजारी त्यांच्या घराण्याचं वडिलोपार्जित घर होतं. तिथे २९ जानेवारी १८७१  रोजी त्यांचा जन्म झाला. 
त्यांचा वडिलांचे नाव शिवराम रामकृष्ण आईचे नाव म मणिकर्णिनिकाबाई होते.त्यांना आधी वामाराव आणि नारायणराव हे पुत्र झाले आणि नारायणरावांच्या नंतर वीस वर्षांनी कवी चंद्रशेखर यांचा जन्म झाला. ते शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण होते. 

त्यांचे मराठी शिक्षण दाजी पंतोजी यांच्या गावातील शाळेत झाले आणि नाशिक मधील  सरकारी नंबर ३ या शाळेत झाले. पाचवी इयत्ता मराठीत उत्तीर्ण झाल्यानंतर ते इंग्रजी शिकण्यासाठी  नाशिक हायस्कूलला जाऊ लागले. 

 त्यांच्या कवितालेखनची सुरुवात कशी झाली याचा ही एक  सुंदर किस्सा आहे . ते शाळेला सुट्टी लागल्यानंतर सिन्नरला आपल्या नातेवाईकांकडे गेले होते त्यावेळी सिन्नर हे बागायतदार क्षेत्र होतं तिकडंचा , निसर्ग खूप सुंदर होता, मनाला भावणारा असा होता आणि अशा वातावरणात त्यांचं कवी मन जागं झालं आणि ते गुणगुणायला लागेले आणि त्यांनी आपला  पहिला स्तोत्र हा त्यावेळी लिहून काढला  तो असा होता. 

 '  नारायणा शरण त्या करुणालया मी ' 

त्यांनी ते स्तोत्र त्यांचे काका म्हणजेच गोपूतात्यां यांना वाचून दाखवले. गोपूतात्यांना ते  खूप आवडले आणि त्यांनी कवी चंद्रशेखर यांच्या पाठीवरती शाब्बासकीचा हात फिरवला आणि तू नक्की कधी होशील अशी शाब्बासकी दिली.

पुढे त्यांचे इंग्रजी शिक्षण बडोदा हायस्कूल आणि त्यानंतर विश्राम बागेतील पुणे हायस्कूल येथे झाले. 

असेच निवांत बसले होते तेव्हा  वसंताची सुरुवात झाले होते कोकिळेचे स्वर  तेव्हा सर्वत्र घुमायला लागले होते  आणि तो कोकिळेचा स्वर   त्यांच्या मनाला मोहून टाकत होता,  आणि यामुळेच त्यांचं  कविमन पुन्हा जाग  झालं आणि त्यांनी आपली पहिली कविता " कोकील " ही रचली  आणि ती १८ मे १८९५ रोजी एका अंकात  प्रकाशितही झाली .

त्यांचे शिक्षण झाल्यावर तिथे पुढे नोकरीधंद्या निमित्त अमदाबाद ला गेले.पण तिकडे त्यांचे कामात मन लागत नव्हते ते कवितेच्या विश्वास हरवत चाललेले होते. त निमूटपणे अमदाबाड हून बडोद्याला आले व त्यांचे बंधू नारायणराव यांच्या कडे राहिले. त्यांना बर्‍याचशा भाषांचे ज्ञान होतं त्यामुळे तिथे त्यांना सरकारी ऑफिसात कारकुनाची नोकरी मिळाली. प्रथम त्यांनी दिवाण कचेरीत एक वर्ष हंगामी कारकुनाचे काम केले आणि नंतर लगेच त्यांना राज्यातील चीफ मेडिकल ऑफिसर यांनी आपल्या कचेरीत बोलून घेतले. 
याच वेळी त्यांचा कविवर्य दत्तात्रेय कोंडो यांच्याशी परिचय घडून आला . आणि त्यांच्या साहित्यिक बरकतीचा काळ सुरू झाला. 

चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशी कविता त्यांनी लिहिली. इंग्रजी कवितेचे वाचनमनन त्यांनी केलेले असले, तरी तिच्यातील स्वच्छंदतावादी संप्रदायाचे त्यांना आकर्षण नव्हते मात्र मिल्टनसारखा विदग्ध, व्यासंगी कवी त्यांना जवळचा वाटत होता. कवितेतून आत्मलेखन करणे त्यांना मान्य नव्हते. कवितेने ज्ञान आणि रस ह्यांचा एकात्म अनुभव द्यावा, अशी त्यांची काव्यविषयक भूमिका होती आणि ह्या भूमिकेतून त्यांनी काव्यकलेची आजीव आणि निष्ठापूर्वक उपासना केली. पंडीत कवींचे अलीकडच्या काळातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी, असे त्यांना यथार्थपणे म्हटले जाते. ‘गोदागौरव’ आणि ‘कविता-रति’ ह्या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कविता. ‘गोदागौरवा’चे नादमाधुर्य जयदेवाच्या गीतगोविंदाची स्मृती करून देते. ह्या दोन्ही कवितांतील— विशेषतः ‘कविता-रति’ मधील –आत्मपरता चंद्रशेखरांच्या कवितेत अपवादभूत आणि म्हणून विशेष लक्षणीय आहे. कवी म्हणून त्यांची कीर्ती प्रामुख्याने चंद्रिका (१९३२) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहावर अधिष्ठित आहे. ह्या संग्रहास लाभलेल्या यशामुळेच बडोदे संस्थानाचे राजकविपद त्यांना मिळाले.

त्यांनी काही उत्कृष्ट रूपांतरेही केली. मिल्टनच्या इल् पेन्सरोझो  आणि ल’ आलेग्रो  ह्या काव्यांची अनुक्रमे ‘चिंतोपंत उदास’ आणि ‘रंगराव हर्षे’ ह्या नावांनी त्यांनी केलेली रूपांतरे, तसेच ‘काय हो चमत्कार’ हे एका इंग्रजी बॅलडचे रूपांतर ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरतात.

ह्यांशिवाय ‘उगडं गुपित्’ व किस्मतपूरचा जमीनदार (१९३६) ही स्वतंत्र कथाकाव्ये त्यांनी लिहिली असली, तरी ती फारशी मान्यता पावली नाहीत.
त्यांची साहित्यिक संपदा ही पुढील प्रमाणे आहेत 
अर्वाचीन कविता
उघडं गुपित (कथाकाव्य)
कविता रति
किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
गोदागौरव (स्तोत्रकाव्य)
चंद्रिका (स्फुट कवितांचा काव्यसंग्रह -१९३२)
चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
धनगर (दीर्घकाव्य)
रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर
स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)
पुढे त्यांची एक रचना आणि त्याचे  रसग्रहण हे आपल्या समोर मी देत आहे . 

         समरमहिमा
         
         ही कविता कवीने रणभूमी ही विरपत्नी साठी उद्देशून बोलत आहे या अर्थाने लिहिली आहे . कवी चंद्रशेखर आपल्या पहिल्या ओळीत म्हणतात की 

आली तटस्थ झाली, थरके अधरोष्ठ, आंसवें गळती ।
रणदेवताही झाली त्या वीरस्त्रीसमोर विरघळती ।।१।।

 याचा ओळींचा अर्थ असा होतो की  ती  वीर पत्नी तटस्थपणे उभी राहिली आहे . तिचे ओठ थरथर कापतात आणि आता तिची  आसवे ही  गळायला लागलेली आहेत.  ही रण देवताही त्या वीर स्त्रीच्या दुःखामुळे आता स्वतःही दुःखी झाली आहे . 

'बाई' तिला म्हणे ती, पदराने टिपुनी नयनवारीतें ।
'सांगू काय तुला मी आले कामास कारभारी ते! ।।२।।

 या ओळींचा अर्थ असा आहे की आता रण देवताही त्या वीर पत्नीच्या संत्वणासाठी बाकी आलेली आहे आपल्या पदराने ते तिचे अश्रू टिपून घेत आहे. पण रण देवतेला आता काळात नहीये की त्या वीर पत्नीला कसं सांगावं की तिचे स्वामी  आपलं कर्तव्य निभवताना त्यांना वीर मरण आलेल आहे.

पंचाननापरी गे परचक्रावरी तुटोनी तो पडला ।
असहाय! काय करितो? लढला, लढला, थकोनियां पडला! ।।३।।
या ओळींचा आर्थ असा आहे की  वीर शत्रूवर सिन्हा सारखा  तुटून पडला पण रणांगणात शेवटी तो खूप थकला आणि शेवटी असहाय झाला  आणि   लढाता लढता त थकले  जमिनीवर पडला 

पडला गे पडला तो वीर रणी धूलिमाजी पडलाहे ।
कज्जलमिश्रित अश्रू हीच तया तूं तिलांजली वाहे ।।४।।

या ओळीचा आर्थ असा आहे की तो शुर वीर आता निपचित होवून जमिनीवर पडलेला आहे .. आणि तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या काजळ मिश्रित अश्रू हेच तिने  त्यांना वाहिलेली तिलांजली आहे 

विद्युत्प्राय सभोती चमकत असता सुतीव्र तरवारी ।
त्यांतुनी अचल उभा तो, पर्वतगर्व स्वनिश्चयें हारी ।। ५।।

या ओळींचा अर्थ असा आहे की  विजेच्या सारख्या   लखलखनाऱ्या तलवारी  ससभोवतली  चमकत असताना ही तो वीर  निर्धास्त  त्यांच्या समोर उभा राहिला होता त्याला तसं पाहून पर्वताचा गर्व ही त्याच्या पुढे फिका पडला होता. 

जे संग्रामधुरंधर रिपुसंहारार्थ करिती घोर रण ।
त्या वीरांते यावे, तैसे सन्मान्य यास ये मरण ।।६।।

या ओळींचा अर्थ आसा आहे की   रणांगणात  शत्रुच्या संहारासाठी तो वीरा प्रमाणे  लढला आहे . आणि लढता लढता त्याला वीर मरण आलं आहे . 

तद्वेश केशरी तो, झालाहे चिवट मेणकापडसा ।
चढुनी पुटे रुधिराची नुमजे होता तयास रंग कसा ।।७।।

 या ओळींचा अर्थ असा आहे की त्याचा वेश हा केसरी झालं आहे. त्याचे कपडे मेणा सारखे रक्ताने चिकट झाले आहेत. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे एवढे डाग पडले आहेत ही त्या कपड्यांचा मूळ रंग आता ओळखता येत नाही ये.

जेथे देह तयाचा गळला, तेथे तयास तुटवोनी ।
राऊत बहू पडले, शतावधी अरिशिरांस उडवोनी ।। ८।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की शेकडो शत्रूंचे मुंडके उडवल्या नंतर त्यांचा देह शेवटी रणांगणात निपचीत पडला.

अपुल्या प्रिय देशास्तव वीर जसा पाहिजे रणी लढला ।
लढला तसाच तोही, पाहुनी शतशें रिपू स्वयें पडला ।।९।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की तो वीर आपल्या प्रिय देशासाठी विरा प्रमाणे लढला जरी त्याच्या समोर शेकडो शत्रू होते. 


गृंध्रादिक आकाशी घिरट्या जे घालिती प्रभाती ते ।
त्वप्रियजनदेहावरी करितिल उदईक मेजवानीते ।।१०।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की आज आकाशात जे गिधाडे घिरक्या घालत आहेत ते उद्या  युद्धात शहीद झालेले जे वीर होते हे या विरास प्रिय होते पण आता ती गिधाडे त्या  वीरांच्या  देहाचे लागते लचके अन लचके तोडून मेजवानी करतील 

हे वीरवल्लभे तूं संतत करशील शोक बहू त्याचा
कवी गातील तयाचा महिमा तत्प्राणहारिं समराचा ।। ११।।

या ओळींचा अर्थ असा आहे की हे वीर पत्नी तू त्या विराचा रोज  शोक करशील पण  त्यांची महिमा कवी आपल्या कवितेतून सादर करतील त्यांनी दिलेले  बलिदान वाया जाणार नाही त्यांचं कर्तृत्व हे  अखंड जिवंत राहील 

   या कवितेत कवी चंद्रशेखर यांनी किती सुंदर पने  रणभूमीचे आणि त्या रणभूमी साठी लढलेल्या त्या विरचे चित्र रेखाटले आहे.. आपल्या पतीच्या दुःखात चिंब बुडलेल्या वीर पत्नीचे दुःख ही किती सुंदर रित्या मांडलं आहे... किती जिवंत पणा आहे त्याच्या लिखाणात.... आज त्यांची जयंती आहे त्यांना लाख लाख वंदना देतो आणि तूर्तास इथेच थांबतो धन्यवाद. ..
  ( सतिष अहिरे ) 

Friday, 21 January 2022

माधव ज्युलियन

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी आजोळी बडोदा, येथे झाला होता आणि मृत्यू -२९ नोव्हेंबर १९३९ पुण्यामध्ये त्याच्या राहत्या घरी झाला होता. त्यांचं पाळण्यातले नाव 'गजानन' असं होत पण लहान पणी दोन महिन्यांचे असताना ते अखंड रडू लागले म्हणून त्यांच्या आत्या बाईनी त्यांची जोड्याने तुळा केली व घराण्याचा मूळ पुरुष ' महादेव ' हे जुनाट नाव त्यांना ठेवलं. मोठेपणी कॉलेजात गेल्यावर त्यांना ते नाव अवडेनासे झाले आणि १९१२ पासून त्यांनी स्वतःचे नाव बदलून 'माधव ' असे ठेवले आणि तेच नाव पुढे रूढ झाले .
   
    त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला होता.

माधव जूलियन हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधव जूलियन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले .
पण माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.

गजल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव जूलियन यांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. तसेच त्यांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

माधव जूलियन यांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

 माधव जूलियन कार्यमग्न असताना आणि यशाच्या शिखरावर असताना अचानक पणे गेले त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता पुण्याच्या स्वतःच्या राहत्या घरी २९ नोव्हेंबर १९३९ च्या रात्री त्यांची प्राणज्योत मालवली त्यावेळी ते केवळ ४६ वर्षाचे होते.

माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत.
स्वप्नभूमी माधव ज्यूलियन : लेखक शंकर केशव कानेटकर
डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन : लेखक दत्तात्रेय नरसिंह गोखले
माधव ज्यूलियन : गंगाधर देवराम खानोलकर

माधव ज्यलियन यांची ग्रंथ संपदा पुढील प्रमाणे आहे.
उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)
काव्यविहार (निधनोत्तर इ.स. १९४७, लेखसंग्रह)
गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला)
छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
नकुलालङ्कार (इ.स. १९२९, दीर्घकाव्य)
फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)

ते इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते तसेच इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
 इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन.अध्यक्ष होते 
पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.
       माधव ज्युलियन यांना केवळ ४६ वर्षाचं आयुष लाभलं त्यातील सुरुवातीचे २४ वर्ष शैक्षणिक काळ यातून वजा करता फक्त २२ वर्ष त्यांच्या साहित्य कर्तुत्वाचे म्हणता येतील. या अल्प काळात त्यांनी केलेली साहित्य निर्मिती ही विपुल व वैविध्यपूर्ण आहे.
    माधव ज्युलियन यांचं काव्य कर्तुत्व फार मोठा आहे. त्यांचे इतर बरेचसे गद्यलेखनही काव्य लेखनाशी संबंधित आहे.
     त्यांचे सर्व जीवन हे त्यांच्या काव्यात व्यक्त झालेले आहेत. त्यांच्या कवितेला कोणाची ही परंपरा नाही , ती स्वतंत्र आहे. तिच्यावर इंग्रजी ,फारसी ,संस्कृत ,गुजराती या भाषेचेही संस्कार आहेत पण त्या भाषेतील काव्याचे अनुकरण नाही. प्रत्येक काव्यात आशय आणि अभिव्यक्ती या पूर्णपणे वेगळ्या आहेत.
     माधव ज्युलियन यांच्या साहित्यात विविधता आहे त्यांनी स्फुट काव्य लिहिली, दीर्घकाव्य लिहिली ,अनेक लेख लिहिले, फारसी मराठी शब्दकोश तयार केला, छंदोरचना हा काव्याची माहिती आणि त्या संबधित वृत्ते आणि त्यांची उदाहरणे याप्रकारे आपल्या माहितीपूर्ण ग्रंथ लिहून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.
   आम्ही आज देखील त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आहोत. गजल शिकत आहोत लिहत आहोत. मराठी साहित्यात गजल हा प्रकार त्यांनी आणला म्हणून आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत... त्यांच्या कर्तुत्वाला लाख लाख सलाम..  
   आज त्यांची एक कविता आणि तिचं रसग्रहण आपल्या समोर देत आहे .

मराठी असे आमुची मायबोली,
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माऊलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे

मराठी असे आमची मायबोली या कवितेत माधव ज्युलियन याची मराठी विषयीची तळमळ आपल्याला दिसून येते. कवितेतील पहिल्या कडव्यात ते बोलून जातात की मराठी जरी राज भाषा नाही तरी ती आमची माय बोली आहे. आज तिला ते ऐश्वर्य प्राप्त झालेला नाही ते महत्त्व प्राप्त झालेले नाही , तरी मला पूर्णपणे अशी आशा आहे की एक दिवस तिला तिचं महत्त्व तिचं ऐश्वर्य प्राप्त होईल. 
   

जरी पंचखंडातही मान्यता घे
स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

या कडव्यात माधव ज्युलियन सांगताय की आज जरी सात खंड आहेत पूर्वी केवळ पाच खंड होती . आणि त्या काळातही इंग्रजीचं वर्चस्व पाचही खंडांमध्ये होतं इंग्रजी भाषाही त्यावेळी श्रीमंतीच्या शिखरावर होती. इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठी भाषेला तेवढं महत्त्व राहिलं नव्हतं म्हणून कवी ही कळकळीची विनंती करताहेत की आपल्या मायबोलीला असे त्यागु नका. 

जरी मान्यता आज हिंदीस देई
उदेलें नवें राष्ट्र हे हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती
हिची जाणुनी योग्यता थोरवी
मराठी असे आमुची मायबोली,
जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी,
हिच्या एक ताटात आम्ही बसूं!

या कडव्यात माधव ज्युलियन यांना असे बोलायचे आहे की जरी आज हिंदी भाषेला देशभर मान्यता प्राप्त झाली असेल. हे जरी नवे हिंदवी राज्य तयार झाले असेल तरीपण जे मनापासून मराठी आहे त्यांच्या मनात आपली मायबोली मराठीही वसते ते जरी भिन्न भिन्न जातीची धर्माचे असो वा पंतांचे असो तरीही आपल्या मायबोली बद्दल त्यांच्या मनात आस्था आहे. आणि आपल्या माय मराठी साठी आम्ही बंधुभाव हृदयात बसवला आहे आणि आपल्या मायबोलीसाठी आ आपापसातले मतभेद विसरून सर्व एकत्र आलेलो आहोत. 

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं,
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी,
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे,
हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं!

या कडव्यात माधव ज्युलियन यांना असं बोलायचं आहे की आम्ही या माय मराठीचे पुत्र आहोत तिचे पांग आम्ही नक्कीच फेडू आमच्या हृदय मंदिरात फक्त माय मराठीच वसते आम्ही सगळे मिळून तिला या जगात मान्यता मिळवून देऊ तिला वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवू. 


मराठी असे आमुची मायबोली
अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ती गेली
उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळीं

या कडव्यात माधव ज्युलियन असं बोलायचं आहे की मराठी ही आपली थोर मायबोली आहे पण पारतंत्र्यात ही खूप खंगली गेली आहे दुर्लक्षित झाली आहे. आपल्या मायबोलीकच्या संपत्तीचा लोकांना आता विसर पडला आहे काळाच्या ओघात आपल्या माय मराठी ची संपत्ती ही एकदम तळाला जाऊन पोचलेली आहे.

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें
नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा
जगांतील भाषा हिला खंडणी

या कडव्यात माधव जूलियन यांना असे बोलायचे आहे की आपल्या माय मराठीच्या साहित्य साठा हा सागरासारखा अखंड आहे विराट आहे त्यांच्या आम्ही सगळे मिळून मंथन करू आणि त्यातून जी साहित्यातली उत्कृष्ट अशी रत्ने आहेत त्यांना एक एक करून बाहेर काढू त्यांना जगाच्या समोर घेऊन जाऊ आमची साहित्य समृद्धी एवढी अफाट आहे अखंड आहे की तिला दुसऱ्या कोणत्याही भाषेचं ऋण घेण्याची गरज नाही उलट जगातील बाकी भाषा या आपल्या माय मराठीचे देणे लागतात. 

          तूर्तास इथेच थांबतो धन्यवाद 
           
              ( सतिष अहिरे ) 

Tuesday, 11 January 2022

वी.स. खांडेकर

वी. स. खांडेकर यांचा  जन्म  ११ जानेवारी १८९८  रोजी सांगली येथे झाला. आणि मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६ रोजी मिरज येथे झाला.

त्यांचं जन्म नाव गणेश आत्माराम खांडेकर होत. ते प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांची ययाती ही सगळ्यात प्रसिद्ध कादंबरी आहे .

वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी) साठी मिळाला आणि  पद्मभूषण पुरस्कार (१९६८) तसेच  ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी मिळालं त्यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.

   त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.

इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

सुनीलकुमार लवटे यांनी वि.स. खांडेकरांचे चरित्र लिहिले आहे; त्यासाठी डाॅ. अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने अर्थसाहाय्य केले आहे.

अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे. आणि त्यांची प्रकाशित झालेली  पुस्तके पुढील प्रमाणे आहेत .
१ अजून येतो वास फुलांना, २अमृत (पटकथा) ,३अमृतवेल
४ अविनाश, ५ अश्रू, ६ अश्रू आणि हास्य  ७ आगरकर  व्यकी आणि विचार, ८ उल्का (१९३४) (कादंबरी व पटकथा) ९ उःशाप, १०कल्पलता ११कांचनमृग (१९३१) १२ कालची स्वप्ने, १३ कालिका, १४ क्रौंचवध (१९४२), १५घरटे, १६ घरट्याबाहेर १७चंदेरी स्वप्ने, १८ चांदण्यात
छाया (पटकथा) १९ जळलेला मोहर , (१९४७ )  २० जीवनशिल्पी, २१ ज्वाला (पटकथा), २२ झिमझिम, २३तिसरा प्रहर, २४ तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३.         २५ ते दिवस, ती माणसे ,२६ दंवबिंदू ,२८देवता (पटकथा)
२८ दोन ध्रुव (१९३४), २९ दोन मने (१९३८), ३०धर्मपत्नी(पटकथा), ३१ धुके, ३२  नवा प्रातःकाल ३३ परदेशी (पटकथा) , ३४ पहिली लाट ,३५ पहिले पान
३६ पहिले प्रेम (१९४०) ३७ पाकळ्या ३८ पांढरे ढग (१९४९) ३९ पारिजात भाग १, २ ४० पाषाणपूजा ,       ४१ पूजन, ४२ फुले आणि काटे ४३ फुले आणि दगड    ४४ मंजिऱ्या, ४५ मंझधार ४६ मंदाकिनी ४७ मध्यरात्र ४८ मृगजळातील कळ्या ४९ ययाति ५० रंग आणि गंध ५१ रिकामा देव्हारा (१९३९) ५२ रेखा आणि रंग ५३लग्न पहावे करून (पटकथा व संवाद) ५४ वामन मल्हार जोशी : ५५ व्यक्ति-विचार ५६ वायुलहरी ५७ वासंतिका ५८ विद्युत्‌ प्रकाश ५९ वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८) ६० समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
६१ समाधीवरील फुले ६२ सहा भाषणे ६३ सांजवात ६४ साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
६५ सुखाचा शोध ६६ सुवर्णकण ६७ सूर्यकमळे ६८ सोनेरी ६९ सावली (पटकथा) ७० सोनेरी स्वप्ने भंगलेली.           ७१ स्त्री आणि पुरुष ७२ हिरवळ ७३ हिरवा चाफा (१९३८)
७४ हृदयाची हाक (१९३०) ७५ क्षितिजस्पर्श

पुढे वी. स खांडेकरांच्या कवितेतील काही ओळी व त्यांचं रस ग्रहण देत आहे

कोण दुजा आधार ?
तुजविण, कोण दुजा आधार ?

( हे पती परमेश्वरा तुझ्या विना आता मला हा कोणता आधार आहे अशी वी . स खांडेकर पती परमेश्वराला करून हाक मारत आहेत  )

अवतीभवती पहा दाटला अवसेचा अंधार
काजळले नभ, काजळले मन, व्याकुळले मी फार

( आवती भवती अवसेचा खूप अंधार दाटला आहे . नभ आता त्या आधारे व्यापून गेलं आहे . आणि अशा उदास वातावरणात माझं मन देखील खूप उदास झालं आहे खिन्न झालं आहे  व्याकूळ झालं आहे )

कशि सावरू ? कुठे निवारा ? घालु कुणावर भार ?
पतितपावना एक तुझे मज उघडे आता दार
( आता मी स्वतःला कसं सावरु , आता कुठे मला प्रमाचा निवारा भेटेल. आता मी माझं दुःख कोणाला सांगू  त्याचा  भार  कसा हलक करू .

     एक एक ओळ अंगावर काटा आणतो. आपल्या काळजाच्या वेदनांना केवढ्या प्रभावी पने आणि  तरल ते ने   त्यांनी मांडलं आहे.   कुठे ही शब्दांची अती शोक्ती नाही.. ना कुठे ही अवजड अशा शब्दांचा वापर  नाही. त्या मूळचे त्याची कविता ही खूप जिवंत वाटते बोलली वाटते. काळजाला भिडते .
     अशा थोर लेखकाला  माझे कोटी कोटी प्रणाम.
    
       ( सतिष अहिरे ) 

Thursday, 6 January 2022

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म१९४३
सुल्लाळी, उस्मानाबाद मध्ये झाला होता व मृत्यू
जानेवारी ६, २०१० झाला होता . 
(आता हे गाव लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात आहे)

लहानपणी डोईवरचे माता-पित्याचे छत्र हरवले असले तरी, बहिणीने त्यांचा सांभाळ केला. गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा चालू होती. महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून त्यांनी एलए‌ल.बी.चे शिक्षण पूर्ण केले.
प्रा. सोनकांबळे सुरुवातीला गल्ले बोरगाव येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले. इ.स. १९६६ मध्ये ते डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. व पुढे त्याच विभागाचे प्रमुख झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद आणि इ.स. १९८८ मध्ये प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. तेथूनच ते निवृत्त झाले.
     
    साहित्य व सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कोणत्याही कार्यक्रमाला प्रा. सोनकांबळे गेले की ते तेथील व्यक्तींना आपल्या खिशातली फुले व खडीसाखर देत. एक सहृदयी आणि प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

त्यांनी नाटक, साहित्य
चळवळ दलित साहित्य, मराठी साहित्य यात आपले मोलाचे योगदान दिले त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती
 आठवणींचे पक्षी हे आहे .
 
प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांना आपल्या जीवन काळात 
साहित्य अकादमी पुरस्कार(१९८३)
आदर्श शिक्षक पुरस्कार(१९९७)
'बेस्ट सिटिझन' हे पुरस्कार प्राप्त झाले. 
 औरंगाबादमधील तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तसेच 
मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील झाले होते.

  प्रा. सोनकांबळे यांना साहित्य अकादमीचा १९८३मध्ये पुरस्कार मिळाला.
राज्य शासनानेदेखील पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.
लातूर नगरपरिषदेने प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचा भूमिपुत्र म्हणून विशेष सत्कार केला होता.
अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रा. सोनकांबळे यांना प्रदान करण्यात आला होता.
रयत शिक्षणसंस्थेचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९७)

आठवणींचे पक्षी : प्र. ई. सोनकांबळे यांचा आत्मकथनात्मक आठवणींचा लेखसंग्रह. दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ते ओळखले जाते. जीवनातील खडतर जातवास्तवाचे अनुभव प्र. ई. सोनकांबळे यांनी या लेखसंग्रहातून मांडले आहेत. या आत्मकथनात दलित जीवनाच्या मूलगामी दुःखाचे चित्रण येते. प्र. ई. सोनकांबळे यांच्या बालपणाची आणि शिक्षण काळातील हाल-अपेष्टांचे दर्शन प्रामुख्याने या आत्मकथनामध्ये घडते.१९६४ साली मिलिंद महाविद्यालयाच्या वार्षिकांकात प्रथमतः या आत्मलेखनातील लेख प्रसिद्ध झाला.म.ना.वानखेडे यांच्या प्रोत्साहनामुळे हे लेखन घडले असल्याचे सोनकांबळे सांगतात.आरंभी यात १५ लेख होते. नंतरच्या आवृत्तीत ही संख्या २८ झालेली आहे.
आई मेल्यानंतर पोरका झालेला ‘परलाद’ ते प्राध्यापक व्यवसायात पडलेले प्र. ई.सोनकांबळे असा विस्तृत जीवनपट या आत्मकथनामध्ये मध्ये आहे.बालपणापासून कष्ट ते बहिणीकडे आश्रित म्हणून राहत असताना पडेल ती कामे करण्याचा जीवनाभुव त्यात आहे.अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चिंचोके, मृत जनावरांचे मांस त्यांना खावे लागले आहे. चतकोर भाकरीसाठी मेलेले कुत्रेही ओढून टाकावे लागले आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी प्र. ई. सोनकांबळे यांना अनेक लहान-मोठी कामे करावी लागली आहेत. महारोगी म्हातारीच्या ताटलीत जेवण्याचा आणि संडासमागे जाऊन भाकरीचा तुकडा खाण्याचा मन विषण्ण करणारा प्रसंगही यात आहे.अस्पृश्य समाजात जन्माला आल्याने सोनकांबळे यांना वारंवार अपमान, अवहेलना सहन करावी लागली आहे.जातीयता आणि आर्थिक विषमतेवरचे खोलवरचे चित्रण या आत्मकथनात आहे.जातीयतेच्या -उपेक्षेच्या आणि अवहेलनेच्या असंख्य अडचणीतून जीवनसंघर्षाचे रूप या आत्मकथनातून प्रकटले आहे.
मराठवाड्यातील उदगीर भागातील बोलीचा वापर, हा या आत्मकथनाचा महत्त्वाचा विशेष आहे. बोली भाषेमुळे यातील आठवणींना जिवंतपणा प्राप्त झालेला आहे. सोनकांबळे यांच्या अनुभवविश्वाला साजेशी ही भाषा असून कोणताही संकोच न बाळगता मोठ्या धिटाईने व मोकळेपणाने त्यांनी आठवणींचे कथन केले आहे. प्रचंड अन्याय सोसूनही सोनकांबळे कोणाविषयी मनात अढी बाळगत नाहीत. उलट मदत करणाऱ्या सहानभूती दाखविणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख ते अतिशय नम्रपणे करतात.आत्मकथनाचे अकरा भारतीय भाषांत भाषांतरही झाले आहे.
              ( सतीष अहिरे ) 





डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर

 डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्हात बागणी गावात झाला होता आणि मृत्यू एप्रिल २०, २००८ पुण्यात झाला होता. त्या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्‍या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते.
 
   त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास, लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन इत्यादी कामे त्यांनी पार पाडली होती .

सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले.

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला चिं.ग. कर्वे हे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच सन 1958 मध्ये नियोजन आयोगाच्या शिक्षण विभागाच्या शिफारसीनुसार दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्त्री शिक्षणासंबंधीच्या आयोगाच्या त्या सचिव होत्या.

सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम होती. त्यांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले होते. त्या अत्यंत उत्तम प्रकारे लोकगीते म्हणत असत.


डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर त्यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या पुढील प्रमाणे आहे
अजिता (१९५३),आठवतंय तेवढं सांगते (१९५५),इथं गोष्ट संपली, कमळाचं जाळं (१९४६)
तू भेटायला नको होतास, स्वयंवर (१९७९), हिरवा चुडा

कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह पुढील प्रमाणे 
आमची गाणी, काळी मखमल, कुलाचार, खिरापत, खुणेची पाने, गुलाबकळी, ग्रामलक्ष्मी, चंद्राची भारजा, चिंचेची ,पत्रावळी, झालं गेलं सांगते, डोंगरची मैना, देवदर्शन, धरित्रीच्या लेकी, नवलाख तारांगण, नवलाखी हार, नव्याची पुनव, निरशा दुधाची घागर, निळे डोळे, पाटपाणी, भांगातुरा,भिंगरी, भूक लाडू तहान लाडू, मंगलाक्षता, महिला मंडळ, मानवी प्रवास, माहेरचा चंद्रमा, माझ्या घरची, मुक्तांगणं, यशोधरा, राधाई, राही रुक्मिणी, रुखवत, सुशोभन, स्थित्यंतर, स्वारी सुखात आहे.

  डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर याचे पप्रकशित झालेले काव्यसंग्रह . चाफेकळी, झोळणा (१९६४) हे आहेत.
  
  महिलांविषयक हे त्यांचे पुढील साहित्य आहे 
  मराठीतील स्त्रीधन, वनिता सारस्वत (१९६१)
  स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  स्त्रीशिक्षणाची वाटचाल 
  बालवाङ्मय मधे काचेची पेन्सील, जम्माडी जम्मत : भाग १ आणि २, बालनाटिका : भाग १ ते ४, भारतीय स्त्रीरत्‍ने भाग १ ते ४ इत्याती आहेत .
  
 माझ्या खुणा माझ्या मला हे त्यांचं आत्मचरित्र आहे 

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी संपादित केलेले पुस्तके 
आदिवासींचे सण-उत्सव, एक होता राजा, कारागिरी, कुलदैवत, छंद माझा आगळा, जनलोकांचा सामवेद, जाई मोगरा, जा माझ्या माहेरा, तीर्थांचे सागर, दसरा दिवाळी, नंदादीप, नादब्रम्ह, बाळराजे, भोंडला भुलाबाई
महाराष्ट्र लोकसाहित्य माला : ए्कूण ५ भाग
मी पाहिलेले यशवंतराव (१९८८), रांगोळी, राजविलासी, केवडा, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती - संमेलन वृतांत, लोकसाहित्य - भाषा आणि संस्कृती, लोकसाहित्य :, शब्दकोश, लोकसाहित्य साजशिणगार, वसंतदादा गौरव, ग्रंथ, वैजयंती, श्रावण भाद्रपद, समाज शिक्षण माला(नियतकालिक) (१९५० पासून), सांगीवांगी, स्त्रियांचे खेळ आणि गाणी इत्यादी आहेत 

आणि त्यांनी सहसंपादित केलेली पुस्तके ही पुढील प्रमाणे आहेत .
इयत्ता ७ वीसाठी क्रमिक म्हणून तयार केलेलं पुस्तक- मराठी शालेय अभ्यास (सामान्य मराठी) सह संपादक- बा.वा.देवधर.
एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला आणि विकास) सह संपादक- बा.वा.देवधर
साहित्यदर्शन -आधुनिक वाङ्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन (सहलेखक : डॉ.वि.म.कुलकर्णी).
सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - श्री.ना.बनहट्टी

भूषविलेली पदे संपादन करा
१९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
१९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
१९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य

सन्मान व पुरस्कार संपादन करा
२५ मे १९८४ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.
५ फेब्रुवारी १९८२ ला राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’ (२३ डिसेंबर १९९७)
७ सप्टेंबर १९९७ ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार करण्यात आला.
३० जानेवारी १९९२ ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला.
२६ एप्रिल २००७ ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव सत्कार केला .
१० फेब्रुवारी २००८ ला पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दिला.
२३ ऑक्टोबर १९९७ ला पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा गौरव
मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार
जानेवारी १९९२ मध्ये शिवसेनेने, रमाई प्रतिष्ठानतर्फे सौ.मीनाताई ठाकरे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने अंधेरीच्या शहाजी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातल्या काही कर्तबगार स्त्रियांचा गौरव केला. त्यात डॉ.सरोजिनी बाबर यांचा सत्कार करण्यात आला.
१ ऑक्टोबर १९९५ ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
१२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
२७ डिसेंबर १९९६ ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे सरोजिनी बाबर यांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.

अशा थोर विचारवंत आणि साहित्यिक केला माझा कोटी कोटी प्रणाम जाता जाता त्यांची एक कविता खास आपल्यासाठी 

अडगूळ मडगूळ सोन्याचं कडबुळं
खेळायला आलं गं , लाडाच डबुलं

गालात हसून ,ओठात बोलून
हातानं खेळत काय ग म्हणाल

जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं 
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं

रांगत रांगत , हअम डौलत
 गुढग्यावर रेलून काय ग पाहिलं 

फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून 
कारंजं उडवीत कसं ग रागावलं

झेप झेपावून तोल सारून
नाचून नाचून पाय खुळखुळलं 

काजळ तितीट बाळाच्या मुठीत
माझ्या जीवचं सुख दाटलं 


  ( सतिष अहिरे ) 

Monday, 18 January 2021

गजल सखीची

गजल ही काळजाची भाषा आहे तशी ती बदलत्या युगाबरोबर प्रेमाची  बदललेली भाषाही आहे. सतिष अहिरे हे नव्या पिढीतील एक युवा गजलकार अशी नवी परिमाणे घेऊन येत आहेत एक नवाकोरा गजलसंग्रह  ' गजल सखीची'.

धुंद गुलाबी छटांची , नव्या नव्या खयालांची , छोट्या बहारांची , नाजुक भावनांनी नटलेली अशी ही गजल आहे . तिच्यात शृंगार आहे , संयम आहे , साज आहे आणि तिचा स्वतःचा एक बाज आहे . तिच्यात रसिल्या मनाचे विभ्रम आहेत . मन मोगऱ्याच गधं आहे. सखी साठी वेडावलेलं धुंद मन आहे . नावीण्यातील तंत्रशुद्ध छंद आहे . अनोख्या खयालांचा रचना बंध आहे . जीवनमूल्यांची जाण आहे . संस्कारशीलतेचा सन्मान आहे .  अशी ही सुंदर प्रतिमा व  प्रतिकातून रचनेतील उत्कटतेचे दर्शन घडविते. त्यांच्या गजलेत तरलता आहे , हळूवरपणा आहे, लुसलुसित गर्द हिरवे मन आहे .एक सुंदर भाव भावनांचा उत्कट  उत्युंग  झोका आहे .

गजलची आस आणि ध्यास असलेला हा युवा गजलकार      ' गजल सखीची ' या गजल संग्रहातून रसिकांना नक्कीच भुरळ घालील याची खात्री आहे या संग्रहाचे मन भरून कौतुक आणि स्वागत . अनेक हार्दिक शुभेच्छा !

     रोहिदास पोटे
     ( माजी  शिक्षण सहसंचालक म. रा. पुणे )
     कवी /गजलकार / समीक्षक.)
गजल सखीची ( गजल संग्रह )

गजलकार -  सतिष अहिरे

प्रस्तावना - ए के शेख ( जेष्ठ गजलकार )

प्रकाशन - महाजन पब्लिशिंग हाऊस ( पुणे )

मुखपृष्ठ - संतोष घोंगडे

मलपृष्ठ- रोहिदास पोटे (  माजी शिक्षण सहसंचालक कवी ज्येष्ठ गझलकार )

मूल्य - 145 रुपये + (पोष्टल खर्च वेगळा)

आपली प्रत आजच बुक करा...

संपर्क - सतिष अहिरे  (9321540040 ) अथवा

सतिष अहिरे  (गुगल पे )
(मो. नं - ) 9321540040


Monday, 11 May 2020

काळजाचा तुकडा

आज सुट्टीचा दिवस होता तरी घरी खूप गडबड होती. कारण आज मधूला  पाहण्यासाठी पुण्यावरून पाहुणे येणार होते.  सरिता सकाळी उठल्यापासूनच कामाला लागली होती. घर आवरण्यापासून तर जेवणाच्या तयारी पर्यंत सगळं तिने केल होत.
आता दहा वाजून गेले होते. तरी मधु आपल्या बेडरूम मधून बाहेर पडली  नव्हती. 
सरिता वैतागली आणि रागा- रागात मधूच्या बेडरूम मध्ये गेली.मधु अजूनही बेड वरच लोळत पडली होती. तिला तसं बघून सरीतला अजून राग आला आणि ती मधूल बोलली
" गधडे...!"
 "किती वेळ झाला आहे आणि तू अजून ही बेड वरच पडली आहेस. वेळ प्रसंग काही कळतो की नाही तुला , की सगळे दिवससारखे आहेत तुझ्यासाठी,  कालच मी तुला सांगितलं होतं की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत.
जरा उठून आईला मदत करायची तर गधडी अजून लोळत पडली आहेस."
मधुने आळस दिला , कूस बदली..आणि पुन्हा झोपली.
सरिता वैतागून मधू कडे गेली आणि तिची चादर ओढून काढली..
मधू लाडात बोलली.
" काय ग आई का कटकट करतेय, तुला माहीत आहे ना,  मला एकदाच दिवस सुट्टी असते.  ." 
सरिता पुन्हा रागात बोलली.
" हो माहीत आहे मला पण मी तुला केव्हा असं सुट्टीच्या दिवशी उठलय का ?."
मधू आळस देऊन बोलली
" हुम .. नाही उठवल."
" मग आजच का उठवतेय मी तुला ,काही लक्षात आहे का तुझ्या ?'
"काल काय सांगितलं होतं मी तुला.?
मधु तोंड वाकड करून बोलली.
" आपल्याकडे पुण्यावरून  पाहुणे येणार आहेत ते पण मला पाहायला ".
"मग" 
मधू पुन्हा लाडात बोलली.
" आई आता ते काय विमानाने  येणार आहेत का आपल्या कडे, आणि डायरेक्ट आपल्या गच्चीवर लँड होणार आहेत." अग पुण्यावरून येणार आहेत ते  अजून वेळ लागेल त्यांना यायला मला झोपू देना."
मधूनच बोलणं ऐकून सरिता अजून वैतागली आणि बोलली.
" तुला बोलून काही फायदा नाही. तुझा अवतार बघून लोक मलाच बोलतील की आई ने काही शिकवलं नाही पोरीला.."
आणि  मी सकाळ पासून राब-राब राबतेय जरा उठून आईला मदत करायची तर अजून झोपून पडली आहेस मी एकटीने कुठे कुठे आणि काय काय  बघायचं.
सरिता खूप गंभीर झाली.. अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं . तिचा आवाज जड झाला आणि दबलेल्या आवाजात ती बोलायला लागली..
"  आज तुझे बाबा असते तर."
मधूला सरीताची ती अवस्था बघवली नाही, मधू लागचे पुढे सरसावली.  तिने सरीताच्या  तोंडावर हात ठेवला. आणि बोलली
" आई , बाबा आहेत आपल्या सोबत .. ते कुठे जरी असले तरी... हा आणि आत्ता बाबांनी तुला असं रडताना बघितलं असतं तर आवडलं असतं का त्यांना." 
सारिताने नकारार्थी मान हलवली..
" मग तू का रडतेय.?" 
मधूने अलगद पणे सरीताचे डोळे पुसले आणि तिला गच्च मिठी मारली. 
मधुनी मिठी मारल्यावर सरीताला आपले अश्रु रोखता आले नाही ती तुटून गेली  आणि मधूला  बिलगून पुन्हा रडायला लागली. सरीतला रडताना बघून मधूचाही उर भरून आला आणि तीही रडायला लागली. त्या बराच वेळ एकमेकांना बिलगून रडत होत्या.
मग काही वेळाने फोन ची रिंग वाजायला लागली..फोनची रिंग एकूण सरिता भानावर आली, तिने आपली मिठीची घडी मोकळी केली. मधूचे डोळे पुसले, मधूला शांत केलं आणि अंघोळ वैगरे सर्व आवरून घ्यायला सांगितल.
आणि फोन बघितला.
पाहते तर काय फोन पो पुण्याच्या पाहून्यानाचाच होता. सारिताने स्वतःला सावरलं आणि फोन उचलला.
समोरून आवाज आला
" हॅलो.. सरिता इनामदार आहेत का
" हो मीच बोलतेय ." 
" मी प्रशांत पाटील . आज तुमच्या मुलीला बारा पर्यत बघायला यायचं अस आपलं ठरलं होत पण रस्त्यात खूप ट्राफिक लागलं आहे,  तर आम्हाला यायला जर उशीर होईल म्हणून तुमची  आधीच  माफी मागतो. हा आणि जेवणाचा वेळ तशी  निघून जाईल तर आम्ही वाटेतच जेवून येणार आहोत तर जेवणाचा काही बेत ठेवू नका."
सरिता मग पटकन बोलली.
" आहो प्रशांत असं कसं चालेल तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी येताय..
प्रशांत आदराने बोलले.
" हो सरिता जी तुमच बरोबर आहे पण आम्हाला यायला खूप उशीर होणार आहे आणि आजच्या आज आम्हाला  पुन्हा पुण्याला वापीस जायचं आहे, तर तुम्ही बिलकुल धावपळ करू नका आणि  कसला ही संकोजमना मध्ये धरू नका.
सरिता ठीक आहे असं बोलाली आणि तिने फोन ठेवला. 
प्रशांतच बोलणं ऐकून सरिता खूप  सुखावली आणि तिच्या मनात  विचारांचं चक्र सुरू झालं . खरंच किती समजुदार लोक आहेत ,किती आदराने बोलते होते प्रशांत . जर पुढे ही गोष्ट वाढली तर मधूला किती चांगलं घर भेटेल...आपली मधू त्यांना आवडेल काय..? नेमक्या कोणत्या अपेक्षा असतील त्यांच्या ?
मधूला ही मुलगा आवडेल का."? 
 सरिता आपल्याच विचारात मग्न होती तेवढयात तिकडे मधु आली मधूने आपली अंघोळ आवरली होती आणि आपले केस ती टॉवेल ने सुकवत होती . मधू साठी सारिताने आधीच साडी काढून बेड वर ठेवली होती..
त्या साडीला बघून मधू वैतागून बोलली 
" ये आई मी  काही साडी - बिडी नाही घालणार.
" का ग ? 
"  काय ग आई मी कधी साडी घालते का ? 
" बाळा पद्धत असते ती , साडी घालायला च लागते आशा वेळी.
मधू वैतागून बोलली 
" आई ते मला बघायला येणार आहे का माझ्या साडीला.." 
सरिता मधूला समजावत बोलली 
" बेटा हट्ट का करतेय तू आता ते लोक कधी ही येतील आता  तू पटापट आवर सगळं.
मधू मस्करीने म्हणाली 
" आवर काय आवर.. मला कुठे येतेय साडी घायलायला.."
सरिता हसू आलं आणि ती बोलली..
" हो ठीक आहे पण तू कधी शिकणार.. मी आहे तो पर्यंत सगळं ठीक आहे पण  मी नसल्यावर तू काय करशील ?.
सरीताच बोलणं ऐकून मधू रागात बोलली
" असं काही पण काय बोलते तू आई.." 
"  मी तुला कुठेच जाऊ देणार नाही ".हा आणि मी पण तुला सोडून कुठे जाणार नाही.
 सरिता मस्करीने बोलली 
" आता तू सासरी जाशील तेव्हा मी थोडीच असणार आहे तुझ्या सोबत." तुला एकटीलाच तिकडे जावं लागेल ना. 
" ये आई मी कुठे ही जाणार नाही तुला सोडून आणि  मीच का जायचं. त्या नवऱ्या मुलालाच आपण घरी घेऊन येऊ ते काय बोलतात ना काय ते घर जावई वैगरे तसं करू.
मधूच बोलणं ऐकून सरिता हसायला लागली आणि बोलली 
" वा...! वा...!वा..! खूप हुशार झाली आहेस तू.
बस झालं पण आता आवर पटकन , ते लोक येतील आता  कधी पण . 
मधू हातात साडी घेऊन आरशा समोर उभी राहिली. तिने आपल्या डाव्या खांद्यावर साडीचा पदर टाकला आणि  स्वतःला आरशात बघून गालातल्या गालात हसायला लागली.
सरिता भारावून मधू कडे पाहत होती. मधू नेहेमी पेक्षा तिला खूप वेगळी वाटत होती..मधुच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक  सरीताला दिसत होती.
मधूने आता साडी नेसायला घेतली, तिने भर भर मिऱ्या घालून पदर नीट केला आणि साडीला पिना लावून घेतल्या काही वेळातच ती सूंदर साडी नेसून तयार झाली.. मधूने स्वतःला पुन्हा आरशात पाहुन एक गिरकी घेतली आणि लाजयला लागली.
सरिता मधू कडे एकटक पाहत होती. सरीताला विश्वासच बसेना मधूने आज स्वतःहून साडी घातली. सरिता च्या मनात राहून-राहून विचार यालायला लागले.
" पाहता पाहता माझं लेकरू केवढ मोठं  झालं , मला कळचं नाही.."
"कोणाची दुष्ट नको लागायला, बाई माझ्या बाळाला..किती सुंदर दिसतेय आज माझं लेकरू.
मधूने सरीतला तिच्या कडे पाहताना पाहिलं आणि ती लाजली आपली नजर झुकवत ती सरीतला बोलली
" अग आई अशी काय बघतेय माझ्याकडे .."
मधूचा आवाज ऐकून सरिता भानावर आली..
आणि बोलली ..
" काही नाही ग.. डोळे भरून पाहवस वाटाय तुला.."
आज तुझे बाबा असते तर किती खुश झाले असते.. तुला अस बघून.
मधू पुन्हा नजर झुकवत लाजायला लागली.
        आता संध्याकाळ होऊन गेली होती. बाहेर निरव अशी शांतता पसरली होती पण सारिताच्या मनात विचारांचं वादळ सुरू होत.. .. तिच्या मनात ना-ना प्रकारचे विचार यायला लागले..
एवढा वेळ झाला तरीही ते लोक अजून  आले कसे नाहीत ?  पुण्यावरून यायला एवढा वेळ लागतो का ?  त्यांनी आपला विचार तर बदला नसेल ना ?
आता सरिता खूपच बेचैन झाली.. तिने प्रशांतला कॉल करायला फोन हातात घेतला 
आणि तेवढयात दारावरची बेल वाजली..
सरिताने लगबगीने दार उघडलं. पाहते तर काय प्रशांत आणि त्यांचे काही नातेवाईक दारात उभे होते..
सारिताने त्यांना आदरपूर्वक आता बोलावलं. मग काही वेळ इकडच्या तिकडच्या  गोष्टी झाल्या. 
प्रशांत ने मग सरीतला मधूला बोलवायला सांगितलं....
सारिता उठून किचन मधे आली , पाहते तर काय  मधू आधीच पाण्याचे ग्लास घेऊन आता उभी होती... तिने चहा पण करून ठेवला होता. नाश्त्याच्या प्लेट पण लावून ठेवल्या होत्या.
सरिता काही वेळासाठी एकदम आवक झाली... मधूला तिने असं कधी बघितलंच नव्हतं. घरी काही काम असलं तर मधूला आधी आई लागायची स्वतःहून तिने आज पर्यत कोणतंच काम केलं नव्हतं पण आज मधू  चक्क सगळं काम आवरून सरीताच्या पुढे उभी होती.. 
मधूने तिला एकदम  हलक्या आवाजात विचारलं ..
" आई आधी काय नेऊ...
सारिताने  इशाऱ्याने पाणी न्यायला सांगितलं.. आणि सरिता मधू सोबत बाहेर हॉल मध्ये आली.
सारिताने मधूला इशारा केला आणि पाहुण्यांना पाणी द्यायला सांगितलं.
मधू ने सर्व पाहुण्यांना पाणी दिल आणि एक बाजूला जाऊन उभी राहिली.
प्रशांत  ने मधूला सोफ्यावर बसायला संगीतल.
मधूने लागेच सरीताकडे  पाहिलं. सारिताने इशाऱ्याने मधूला बसायला सांगितलं.. आणि मग मधू सोफ्यावर बसली..
प्रशांत मग मधूला प्रश्न विचारायला लागेले.
मधू समजुतदार पणे सगळं ऐकत होती आणि धीराने सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होती.. सरिताला मधूच ते वागणं भारावून टाकत होत. सरीतला वाटत होतं की एव्हड्या सगळ्या लोकांना बघून  मधू घाबरून जाईल.. पण एवढ्या समजूतदारपणा आणि आत्मविश्वासाने ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती.
काही वेळात तो कार्यक्रम आवरला..  प्रशांत ने मधू साठी होकार दिला आणि ते जायला निघाले..
सारिताने त्यांचा हसत मुखाने निरोप घेतला..
सारिताने आता मोकळा श्वास घेतला.. सगळं कस तिच्या मनासारखं झालं होत. तिला आनंदी व्हायला हवं होतं. पण तिच्या आतून काही तरी तुटल्यासारख वाटत होतं..मधू आता आत कपडे बदलायला गेली होती . पाहुणे ही आता निघून गेले होते.. घरात एका वेगळ्याच प्रकारच्या शांततेचा  तिला अनुभव होत होता..
तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं..
हे गेल्यानंतर मधू होती म्हणून जगता आलं मला..मधू जर नसती तर केव्हाच जीव दिला असता मी. 
अगदी काल-पर्वाचीच गोष्ट वाटतेय मला.. मधू तानुल्या पावलांनी अंगणात चालत होती... बोबड्या आवाजात मला बोलावत होती..
पण ही अशी चटकन मोठी कस काय झाली एवढी समजुदार कस काय झाली.
मधू तू का एवढी मोठी झाली पटकन..
अरे काय ही रीत असते जगाची , काळजाच्या तुकड्याला एक  क्षणात परक करून टाकाव लागत.
मधू ही आपल्या पासून दूर जाणार या विचारानेच सरीता चा उर   भरून आलं..आणि  टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. 
 आता रात्र झाली होती ,बाहेर गर्द काळा असा अंधार पडला होता आणि आता सरिता तशीच पाणावलेल्या डोळ्यांनी सोफ्यावर बसली होती... 
मधूची एक एक आठवण काढत...

Sunday, 26 April 2020

हुंदका

बराच वेळ झाला तरी विराज अजून घरी आला नव्हता.  वसुधाला विराजची खूप चिंता वाटत होती.  सूर्य आता  मावळायला लागला होता. संध्याकाळचा मंद वारा अंगाला झोंबत होता. वसुधा विराजला पाहण्या साठी सारखी आता-बाहेर करत होती. शेवटी हताश होऊन ती ओट्यावर येऊन बसली. अंगणात सुकलेल्या पानांचा सडा पडला पडलेला होता . बाहेर नितांत अशी शांतता होती. दूर दूर पर्यंत कोणीच दिसत नव्हतं. तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं.
 आमच्या लग्नाला तीस वर्षे पूर्ण झाले. ते नेहमी मला सांगूनच घराच्या बाहेर जायचे आणि वेळेत घरी परत यायचे. या तीस वर्षात त्यांनी कधीच आपला दिनक्रम बदला नव्हता. पण आज मात्र ते खूपच विचित्र वागले .
मला सकळी दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि चटकन जाग आली. पाहते तर काय , यांनी माझ्या आधी उठून सगळं आवरलं होत आणि ते कुठेतरी जायला निघाले होते.
मी त्यांना विचारलं .
" आहो कुठे निघालात." 
तरी ते मला काही बोलले नाही , तशीच त्यांनी आपली सायकल काढली आणि न बोलताच  निघून गेले.आता बराच वेळ होऊन गेला होता. सूर्य  देखील आता मावळला होता. सगळी कडे अंधार पसरला होता तरी विराज अजून आला नव्हता. जरा कसली चाहूल लागली तरी वसुधाला विराजचा भास होत होता. वसुधा आता खूपच बैचेन झाली तिच्या मनात ना- ना प्रकारचे विचार यायला लागेल होते . ती स्वतःलाच प्रश्न विचारायला लागली.
" हे आज असे का वागेल असतील ?" 
" नेमकं काय चाललं असेल यांच्या मनात"? 
" यांनी स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर.? या विचारांनी वसुधा आता खूपच बैचेन झाली.. तिला नेमकं  काय करायचं हे कळत नव्हतं. 
वसुधाचा उर  भरून आला आणि तिच्या डोळयात एकदम टचकन पाणी आलं..
वसुधा पाणावलेल्या डोळ्यांनी विराजची वाट बघायला लागली.
थोड्या वेळाने तिला सायकलचा आवाज आला. ती धावत - पळत. अंगणातल्या गेट जवळ आली .. तिला दुरून  विराज येताना दिसला. विराजला पाहून तिचा जिवात - जीव आला.. वसुधाने पदराने आपले डोळे पुसले..आणि  ती तिथेच उभी राहिली.
विराज अंगणात आला तरी  तो वसुधाशी  काही बोलला नाही .
वसुधा आता खूपच वैतागली  आणि  रागाच्या भरात बोलायला लागली.
" आहो कुठे गेले होते  सकाळ पासून "? 
" तुम्ही बोलत का नाहीये माझ्याशी ".
" तुम्हाला नेमकं काय झालं आहे ." 
विराज तरीही  वसुधाशी काहीच बोलला नाही.. तो घरात जायला लागला . वसुधा आवेगाने विरजच्या जवळ आली आणि बोलली 
" आहो , आता काय जीव घेणार आहेत का तुम्ही माझा "?
" बोलना काहीतरी !
विराज ने वसुधाच्या डोळ्यात बघितलं आणि क्षणात आपली नजर झुकवली.
आपल्या हातातली पिशवी त्याने वसुधाच्या हातात दिली आणि तिला बोललं.
" वसुधा  खाऊन घे काही , सकाळ पासून तू काहीच खाल्लं नसणार" आणि घरात निघून गेला.
वसुधाने पिशवी उघडून बघितली त्यात शिळ्या भाकरी होत्या आणि एका डब्यात आमटी होती.
 वसुधा मग  घरात आली. तिने मांडणी वरून ताट काढलं आणि त्या शिळ्या भाकरी ताटात काढून घेतल्या. हंड्यातून पाण्याच्या तांब्या भरून घेतला आणि विरजच्या बाजूला येऊन बसली. विराज अजूनही गप्पचं होता तो  खिडकी कडे एकटक पाहत काही विचार करत बसला होता.. वसुधा त्याला बोलली .
" आहो,  तुम्ही पण जरा काही खाऊन घ्या ना .मला माहित आहे तुम्ही पण अजून काही खाल्लं नसणार ". 
विराजने वसुधाकडे  शून्य नजरेने पाहिलं.. आणि बोलला.
" मला भूक नाही ये."
" आहो,  तुम्ही जर काही खाल्लं नाही  तरी  एक साधा घास तरी जाईल  का मला".
" आहो ,खाऊन घ्या ना जरा." 
" तुम्हाला माझी शप्पथ आहे.!"
वसुधाने घास घेतला आणि ती विराजला भरवायला लागली.  नाही -नाही  म्हणत  विरजने तो घेतला , कारण विराजचा आता नाईलाज झाला होता . वसुधाने त्याला आपल्या शप्पथ देऊन अडकवल होत.
आता विराज पण वसुधाला भरवायला लागला होता.. त्यांनी एकमेकांन कडे पाहिले.. आणि भारावून गेले.. थोड्या वेळा साठी त्यांना सगळ्या जगाचा , दुःखाचा विसर पडला.
काही वेळात मग त्यांनी जेवण उरकलं. वसुधाने घर आवरायला घेतलं.. विराजने गोधडी अंथरली आणि अंथरुणावर पडला. वसुधा पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तो तिने विराजच्या उशाशी  ठेवला आणि अंथरूणावर पडली..
काही वेळसाठी कोणीच काही बोललं नाही. पण शेवटी वसुधाला राहवलं नाही आणि तिने विराज ला प्रेमाने विचारलं.
" आहो बोलना नक्की काय झालं आहे."
विराज खूप गंभीर झाला आणि बोलला.
" वसुधा आज हरलो मी". 
" सार काही संपलं !"
वसुधा गहिवरलेल्या आवाजात बोलली
" आहो असं का बोलताय"
" वसुधा या पोटच्या आगी पाई आज मी एवढा वर्ष कमावलेली इज्जत- मानमर्यादा आत्मसन्मान सगळं विकून आलो" 
विराजचा भावनांचा बांध आता फुटला होता ..एखादा पत्यांचा बंगला जसा कोसळावा तास विराज वसुधा समोर कोसळून पडला. .. विराज ने जोरात हंबरडा फोडला आणि तो रडायला लागला... वसुधाने त्याला एकदम गच्च मिठी मारली. विराजची ती अवस्था बघून वसुधाला ही कसतरीच झालं. ती ही मग वेड्या सारखी रडायला लागली.
विराज ने वसुधला रडतांना बघितलं आणि तो भानावर आला..त्यांनी ही वसुधला मग गच्च मिठी मारली.. बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत रडत होते.
काही वेळाने दोघेही शांत झाले. मग विराज बोलायला लागला
" हे  असं किती दिवस चालणार".? 
" महिना झाला तरी सगळा देश बंद करून ठेवला आहे यांनी".
वसुधा धीर देत बोलली 
" आहो हे दिवस पण जातील "
" हा रोगच आसा आलाय की त्याला कोण काय करु शकतं .. रोज किती तरी माणसे मरताय त्याने.
विराज खूप बैचेन होऊन बोलला 
" वसुधा जग जरी थांबलंना तरी पोटाची आग काही केल्या थांबत नाही, हे कळत कसं नाही लोकांना..आग आपल्या सारख्या हातावर पोट असणाऱ्या माणसाने जगायचं तरी कसं. या कोरोनाने मरण्या आधी कित्येक लोक भूकेने मरतील.
वसुधा चिंतेच्या स्वरात बोलली
" हो बरोबर बोलताय तुम्ही , कसं तरी चार घरच भांडी धुवायचे काम मोठ्या मुश्किलने मला भेटलं होत. घराला थोडाफार तरी हातभार लागत होता . पण महिना सगळं काम बंद आहे .या वयात आता दुसरं काही काम पण करता येत नाही मला  .
" पण सगळं ठीक होईल. देव आपली परीक्षा बघतोय.." 
विराज वैतागून बोलला .
" देवा तुझ्या हृदयाला पाझर तरी कधी फुटेल रे.. की तेही दगडा सारखा झालं आहे तुझ्या मूर्ती प्रमाणे.
वसुधा धीराने पुन्हा बोलायला लागली 
" या आधी ही आपल्यावर किती संकट आली पण तुम्ही किती धीराने त्याला सामोरे गेलात.
विराज खूप बैचेन झाला आणि उठून बसला  पुढे हताश होऊन  बोलायला लागला 
" वसुधा या मनगटात अजून खूप ताकद आहे .पण हाताला कामच नाही .. मी काय करू आता मला काहीच कळत नाही ये.
वसुधा ही आता  उठली तिने विराजच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलायला लागली 
" मी काही ओळखत नाही का तुम्हला.. तुम्ही आता पर्यंत एवढ्या हिंमतीने सगळं केलं.. घरच्यांचं आजार पण  मुलाचं शिक्षण सारंच काही तुम्ही केलं  मला वाटलं होतं की आपला मुलगा आधार होईल आपला पण काल आलेल्या पोरीच्या मोहात पडून त्यांने वेगळा संसार थाटला..
आई - बापाला विसरला तो.
विराज रागात बोलला 
" नाव काढू नको त्याच!" 
" हो , हो नाही काढत त्याच नाव पण तुम्हाला आठवत का तेव्हा मी किती खचून गेले होते . तुम्हीच मला सावरलं होते तेव्हा.
" तुम्ही मला काय बोलला होता तेव्हा लक्षात आहे का तुमच्या? 
" हो आहे लक्षात." 
" काय बोलला होतात ? "
" तुझा माझ्यावर विश्वास आहे का  ? 
" हो आणि मी तुम्हाला काय उत्तर दिलं होतं तेव्हा" 
" तू बोलली होतीस ," माझा तुमच्यावर माझ्या पेक्षाही 
वसुधाने आपला हात विरजच्या ओठावर ठेवला ,त्याला गप्प केलं आणि बोलायला लागली
" माझा तुमच्यावर माझ्या पेक्षाही खूप जास्त विश्वास आहे आणि आज ही मी तुम्हाला तेच बोलते आहे की माझा तुमच्यावर माझ्या पेक्षा ही  खूप जास्त विश्वास आहे , मला खात्री आहे की तुम्ही सगळं ठीक कराल . तुम्ही सोबत असलात की मला कसलीच चिंता नाही कसलीच फिकर नाही. 
विराज चिंतेच्या स्वरात बोलला
" वसुधा तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे." 
वसुधा विश्वासाने बोलली .
" परिस्थिती कशी ही असो मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.
का धीर सोडता."
" या वयात ही तुम्ही पडेल ते काम केलं. अगदी सकाळी पेपर टाकण्या पासून ते दुधाच्या पिशव्या पोहोचवण्या पर्यंत सगळं तुम्ही केलं.. त्याच्यानेही घर खर्च निघत नाही म्हणून हॉटेलात नोकरी केली ..लोकांचं उष्ठ- खरकट्ट काढलं..राब- राब राबला पाई- पाई जोडत गेलात.. आणि आपली एक छोटीशी चहाची टपरी टाकली.." 
"  सगळं कसं ठीक चाललं होतं .बाकी काही नाही पण आपल्याला पुरेल एवढा तरी पैसा येतं होता..मी ही कामाला जात होते त्याचा ही जरा हात भार लागत होता.
विराज ने होकार भरला आणि तो पुन्हा शांत झाला
वसुधाने विचारल
" आहो आज नक्की काय झालं तुम्ही सांगितलंच नाही मला. 
विराज गहिवरलेल्या आवाजात बोलला
" वसुधा नको विचारू काही मला झोप आता." 
" जर तुम्ही मला काही सांगितलं नाही तर मला झोप तरी कशी लागेल.. तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि मला काहीच कसं कळतं नाहीये..
" वसुधा तुला माहीत आहे , मला खोटं नाही बोलता येत तुझाशी ..
" हो माहीत आहे मला " . आहो सांगना मला काय झालं ते नाहीतर झोपच नाही लागणार मला सारख तेच ते डोक्यात चालत राहील".
विरजने स्वतःला जरा सावरलं धीर एकवटला आणि बोलायला लागला 
" वसुधा तू जरी मला काही सांगितलं नाही तरी मला कळत सगळं. आठवडा झाला घरात अन्नाचा दाना नाही ये .सुरुवातीला लोकांनी मोठ्या मनाने मदत केली पण बरेच दिवस आता कोण आपल्याकडे फिरकल नाही .म्हणून आज लाज शरम सगळी  बाजूला ठेवून मी जेवढ्या लोकांना ओळख तो त्या सगळ्याकडे गेलो,  काही खायला भेटत की ते मागायला नाहीतर काही किराणा भेटतो का ते मागायला.पण रोज मरे त्याला कोण रडे ही गत झाली. ओळखीची लोक अनोळखी सारखी वागत होती. बऱ्याच लोकांकडे तर जाता पण आलं नाही  कारण गल्ल्या बंद होत्या. काहींची आपल्या सारखीच अवस्था होती.. दिवसभर खूप फिरलो तरी काही भेटलं नाही..
शेवटी लाज शरम सगळी बाजूला ठेवून मारुतीच्या मंदिराच्या बाहेर भीक मागणाऱ्याच्या लाईन मधे जाऊन बसलो.. आधी मला भीती वाटत होती कोणी ओळखीच्या ने बघितलं तर काय होईल पण नंतर  पोटाची आग आतून आवाज देत होती . लाज -शरम, मान सन्मान ,स्वाभिमान यांच्यावर पाणी टाकून मी  तिकडे भीक मागत बसलो..बऱ्याच  वेळाने तिकडे एक भली मुलगी आली आणि  तीने ती भाकर आणि आमटी दिली. मी तसाच मग घरी परत आलो. मला माहित होतं की तू ही सकाळ पासून उपाशी आहेस..
विराजचा तोल पुन्हा गेला आणि तो ढसा ढसा रडायला लागला..
विराजच बोलणं ऐकून वसुधा एकदम सुन्न झाली..तिला खूप मोठा धक्का बसला  होता .. तिचा  ही तोल गेला ती चटकन उठली आणि दरवाजा उघडून बाहेर आली .. आपलं पदर तिनी तोंडाशी गच्च बांधला आणि ती रडायला लागली..बाहेर 
 नितांत अशी शांतता होती..आणि आता फक्त त्या दोघांच्या हुंदक्यांचा आवाज वातावरणात घुमत होता.
                                       .....  सतिष अहिरे

Monday, 20 April 2020

शहाणपण

मला उद्या खूप लवकर कामाला जायचं होतं. उद्या गुरुकुलचा एक्सट्राचा तास होता. मला शाळेचं पण भरपुर काम करायचं होतं आणि उद्याच्या-उद्याच मला ते शाळेत जमा करायचं होत,पण आज दिवसभर माझी खूप धावपळ होणार होती .  कारण यांची तब्बेत आज काही ठीक नव्हती, म्हणून मार्केट मधून भाजीपाला आणण्या पासून ते आनुजाला शाळेतून आणण्या पर्यत सगळं मलाच करावं लागणार होतं
मला यांची खूप चिंता वाटत  राहते . हे कधी ही  स्वतःची काळजी नीट घेत नाहीत. आजारी असले तरी सांगत नाहीत. सगळा आजार अंगावर काढतात.डॉक्टर कडे पटकन जात नाहीत. गोळ्या घ्यायचा कंटाळा करतात. मी किती जरी समजवल त्यांना तरी ,माझं ते काहीच ऐकत नाही.
             आज अनुजा पण खूप गप्प गप्प होती सकाळ पासून. ती अशी कधी गप्प गप्प राहत नाही, मला तिची ही  खूप काळजी वाटत होती.अनुला खूप लाडून ठेवलं आहे यांनी. माझं ती बिलकुल ऐकत नाही. तिला नुसते पापा पाहिजे असतात आणि मी तिला शाळेत घ्यायला गेलेलं  तिला बिलकुल आवडत नाही. आज मी एवढी धावत --पळत गेली तिला शाळेतून परत आणण्यासाठी, तरी मला  बघून ती खूप वैतागली..आणि तावातावाने मला बोलायला लागली.
" ये आऊ तू का आली ? पापा येणार होते ना मला घ्यायला मग तू का आली ?
मी जरा रागाने बघितलं तिच्या कडे पण तीच माझ्याकडे लक्षच नव्हतं ती आपल्याच धुंदीत बोलत होती.
" पापा आज की नाही मला ते गुप्ता अंकल आहेत ना त्यांच्या कडे पाणीपुरी खायला घेवून जाणार होते..नंतर आम्ही ते शिवलिंग काका आहेत ना त्यांच्या कडे आईसक्रीम खायला जाणार होतो.
" आऊ मला आताच्या आत्ता घेऊन चल  पाणीपुरी खायला
" हट आऊ तू का आली ?  तू जा आताच्या आता  घरी आणि पापांना वापीस पाठव.
अनु खूप झाला आगावपणा, काही पाणीपुरी वैगरे मिळणार नाही तुला. चुपचाप घरी चल.मला बाकीची पण बरीच कामे  करायची आहेत .
अनु एकदम लाडात येऊन बोलली मग
"ये आऊ तू एकदम  डाकू आऊ आहेस. मला ओरडली ना तू  थांब तुझं नावच सांगते मी आता पापांना
जा खुशाल सांग.. मग  बघतेच मी  तुला आणि तुझ्या पापांना पण..खूप लाडून ठेवलं आहे तुला तुझ्या पापांनी
अनुने तोंड वाकड केलं आणि माझ्या सोबत चालायला लागली.
बराच वेळ ती काही बोलली नाही पण तिला नंतर राहवलं नाही. 
"आऊ नेहेमी पापा येतात ना मला घ्यायला मग आज तू का आली मला घ्यायला  ? 
पापा का आले नाहीत ? 
मी मग  प्रेमाने सांगितलं तिला
अग पापांची तब्बेत ठीक नाही ये,  म्हणून आज ते आले नाहीत तुला घ्यायला. 
अनु एकदम चिंतेच्या स्वरात अधीरतेने बोलली
"ये आऊ काय झालं गं पापांना ?  सांग ना नीट मला ." सकाळी पण काही नीट बोलले नाही ते माझ्याशी .
बेटा तू आता पटापट चल म्हणजे आपल्याला लवकर जात येईल ना घरी मग तुला कळेल की नेमकं काय झालं आहे.
अनु मग एकदम शांतपणे चालायला लागली.. नेहेमी शाळेतून येताना मला हे पाहिजे मला ते पाहिजे असा हट्ट करणारी अनु आज मात्र खूप शांतपणे चालत होती.
आम्ही काही वेळात घरी पोहोचलो. अनु धावत पळतच त्यांच्या रूम मध्ये गेली आणि त्यांच्या उशाशी जाऊन बसली. अनुची चाहूल लागताच  त्यांना जाग आली. अनुला कवेत घेण्यासाठी ते कूस बदलून उठायला लागले..आणि बोलले 
" अनुताई कधी आली गं तू..?
   शु.!!!
" पापा बोलायचं नाही तुम्ही...
" का ग बेटा ?"
" तुम्ही आजारी आहाता ना."
"तुला कोणी सांगलीत" ? 
" आऊ ने सांगितलं मला .
" हो बेटा पण  काही खास आजारी नाही ये .    
  तू ये माझ्या कडे " 
" चुपचाप झोपा पापा मी गाई गाई करते ना."
अनुने त्यांना काहीच बोलु दिले नाही... त्यांच्या कपाळावर अलगद हाताने थापत ती त्यांना झोपवत होती..तीच ते वागणं बघून मी खूप भारावून गेले होते.... अवघ्या दहा वर्षाच माझं ते लेकरू पण आज किती शहाण्यासारखं वागत होतं.
बराच वेळ झाला अनु त्याच्या उशाशी बसून होती. किती वेळचा तिने आपला शाळेचा साधा ड्रेस पण बदला नव्हता. मी किचन मधून ओरडली तिला 
ये अनु गधडे!!
 काय करतेय कधीची... अजून साधे शाळेचे कपडे पण बदलले नाही तू..
माझा आवाज ऐकून ती रागा-रागात किचन मधे आली आणि बोलली 
" आऊ तुला कळत नाही का पापांची तब्बेत ठीक नाही ये.."?
" पापा आत्ताच झोपले आहे" 
हो माहीत आहे मला पण जरा तुझा अवतार तरी बघ.. अजून शाळेचा ड्रेस सुद्दा बदलला नाही ये तू.. साधं तोंडाला पाणी पण लावल नाहीये तू अजून.. आपल्या पासून काही खाल्लं पण नाही ये तू. जा पटकन आवरून घे आणि खायला घे काही.
" मला भूक नाही ये."
" पापांना ठीक नाही ये  आजून, आणि तुझं काय चाललय."?
बेटा पापा नेहमी तुला काय सांगता लक्षात आहे ना तुझ्या
"हो"
काय सांगतात ? 
" असं बुरशी आणि गंदु नाही राहायचं."
मग पापांनी तुला अस बघितलं तर आवडेल का त्यांना .
" हुम " नाही आवडणार.
बेटा मग जा लवकर आवरून घे.मी कधीचे तुझे कपडे  काढून ठेवले आहेत.
अनुला खूप जीवावर आले होते, तरी ती आत गेली तयारी करायला.
अणुनी पटकन सगळं आवरलं आणि ती लगेच त्यांच्या रूम मध्ये गेली..
आणि थोड्या वेळीने पुन्हा धावत -पळत माझ्या कडे आली...
" ये आऊ ये आऊ"
काय ग अनु 
ती खूप घाबरलेली आणि बैचेन दिसत होती.. तिला नीट बोलता ही येत नव्हतं मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला ..तरी ती शांत होत नव्हती..
" आऊ अग उठना लवकर ,बघ ना काय झालं आहे पापांना.
अनु काय चाललं आहे तुझं मला अजून स्वयंपाक  करायचा आहे..
" ते तू राहूदे आणि आधी चल माझ्या बरोबर "
अनु नी मला अक्षरशा खेचुन नेलं त्यांच्या खोलीत
" आऊ बघ ना पापांच अंग किती गरम लागतंय" 
मी त्यांचं अंग बघितलं तर ते खूप गरम झालेलं होतं.. मला खुप कसतरीच झालं... मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या ते उठत नव्हते.. मला त्यांची ती अवस्था बघवत नव्हती.मला नेमकं काय कराच ते काही सुचत नव्हतं.. मला कसलं भानच राहील नव्हतं ..माझा जीव एकदम गळून पडला होता....
माझी ती अवस्था बघून अनु पण रडायला लागली..
तिचा आवाज ऐकून मी जरा भानावर आले आणि स्वतःला जरा सावरण्याचा प्रयत्न केला.. आणि तिला जवळ घेतलं 
बेटा का रडतेय
" आऊ तू का रडतेय ? 
मी कुठं रडतेय
" आऊ खोटं का बोलतेय तू , तू रडत नाहीये तर तुझ्या डोळ्यात पाणी का आलं आहे ? 
माझे डोळे पण पाणावले होते याच  मला भानच राहील नव्हतं..
अनुनी पुन्हा विचार 
" आऊ काय झालं आहे पापांना ? पापा उठत का नाहीयेत ? 
मी तिला धरी दिला आणि बोलले 
काही नाही झालय पापांना.मी जरा बाजूला आली
आणि लगेच फोन केला डॉक्टरांना आणि त्यांना  सगळी हकीकत  सांगितली . डॉक्टर पण लगेच तातडीने घरी आले.. आणि त्यांना तपासायला लागले... 
डॉक्टरांना बघून अनु लगचे माझ्या मागे येऊन लपली .
त्यांना तपासता तपासता  डॉक्टर मला ते प्रश्न विचारायला लागले. 
" कधी पासून आहे ताप यांना ."?
तीन- चार दिवसा पासून ताप सारख वाटतंय असं बोलत होते मला .
"ठीक आहे " बाकी कोणतं  औषधे घेतली होती यांनी"
हो परसिटोमोल ची टॅबलेट घेतली होती.
" ओके किती वेळ झाला असेल टॅबलेट घेऊन.?'
वेळ काही नेमकं सांगता येणार नाही पण पॅरासिटीमॉल ची टॅबलेट नक्की घेतली होती त्यांनी.
" ठीक आहे असं ते बोलले आणि आपल्या बॅग मधून इंजेक्शन काढायला लागले.. ते इंजेक्शन बघून अनु खूपच घाबरून गेली होती... डॉक्टरांनी इंजेक्शन ला सुई लावली आणि यांच्या दंडात ती टोचायला लागले... तोच अनुच्या डोळ्यातू पाणी वाहायला लागलं... जणू डॉक्टर इंजेक्शन त्यांना लावत होते पण त्याच्या वेदना या अनुला होत होत्या असं वाटत होतं... मी अनुला बाहेरच्या रूम मध्ये जायला सांगितलं तरी ती शांतपणे
तिकडेच उभी होती..
इंजेक्शन देऊन डॉक्टर उठले आणि बोलायला लागले
"मी आता इंजेक्शन दिल आहे  , ताप जरा उतरेल ..पण आज खूप खबरदारी घ्यावी लागेल तुम्हाला ...आज जर ताप उतरला नाही तर यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल..
या काही गोळ्या मी लिहून देत आहे त्या तातडीने घेऊन या..
आणि डॉक्टर निघून गेले..
मी अनु सांगितलं तू पापांन कडे थांब मी पटकन औषधे  घेऊन येते मेडिकल मधून,  आणि मी तशीच घाई घाई ने मेडिकल मध्ये जायला निघाले.. तोच मागून मला अनुचा आवाज आला
" आऊ ये आऊ" 
काय ग अनु ? मला वेळ होतोय, बाबांची औषधे आणायला चालली आहेत ना मी .
अनुने मला इशाऱ्याने दारा जवळ बोलवल.. मला कळेच ना की अनु मला का बोलावतेय.
मी जवळ गेल्यावर तिने डॉक्टरांनी दिलेली औषधांची चिट्टी माझ्या हातात दिल आणि परत घरात निघून गेली..
मी घाई घाईत ती चिठ्ठी घरीच विसरून चालली होती.. मी एकदम धावत- पळतच मेडिकल मध्ये गेली पण त्या चिठ्ठीत लिहलेली एक टॅबलेट त्या जवळच्या मेडिकल मध्ये नव्हती, म्हणून मला मार्केट मध्ये मोठं मेडिकल आहे तिकडे जावं लागलं..मला बराच वेळ लागला घरी यायला...
मी घरी आले तर पाहते तर काय अनु ही त्यांच्या उशाशी बसली होती आणि त्यांच्या कपाळावर ओल्या थंड रुमालाच्या पट्टया ठेवत होती... मी क्षणभर तिच्या कडे बघतच राहिले. मी तिला पाहून खूप भारावून गेले होते..खूप अभिमान वाटत होता मला तिचा .. एवढं सगळं कसं बाई सुचलं असेल या लहानश्या जीवाला . मला काहीच कळत नव्हतं..मी जवळ गेले तिच्या आणि तिला गच्च मिठी मारली 
" आऊ कितीग वेळ लावला तू यायला ? 
 हो ग अनु ते औषध भेटतच नव्हतं म म्हणून वेळ लागला मला यायला 
" ठीक आहे " 
अनु तू हे काय करते? 
" आग आऊ मागे बघ मी एकदा आजारी पडली होती तर पापा पण असेच ओला रुमाल माझ्या कपाळावर ठेवत होतें.." मग मी पटकन बारी पण झालेली ना?
हो.. 
" म्हणून मी तेच करतेय... हा आणि मी माझा माझा रुमाल घेतलं आहे.. तुझा सडू रुमाल नाही घेतलाय...
किती गुणी आहे बाळ माझं 
आमचा आवाज ऐकून हे आता शुद्धीवर आले... त्यांना शुद्धीत आलेलं पाहून  माझा जीवात जीव आला..त्यांना उठेलल पाहून अनुने लगेच मला दूर केलं आणि त्यांना जाऊन बिलगली... त्यांच्या आता बऱ्याच गप्पा चालल्या होत्या.. त्यांची तब्बेत आता  जरा ठीक वाटत होती..
मी स्वयंपाक आवरायला मग किचन मधे गेली...पटापट सगळ आवरलं. आणि अनुला जेवायला बोलावलं.
" आधी पापांना दे जेवायला, मगच मी खाईल."
बेटा आपल्या पासून तू काही खाल्लं नाहीये आधी खाऊन घे तू जरा मी देते नंतर पापांना जेवायला. 
पण अनु माझं काही ऐकतच नव्हती..  शेवटी मी उठले आणि यांना जेवायला दिल... यांचं जेवण झालं की त्यांना औषधे दिली आणि पुन्हा झोपवल .. मी अनुला शोधायला हॉल मध्ये आली तर अनुने आधीच आमच्या जेवणाची ताट लावली होती..
मी तिच्या जवळ गेली तिने मला ताट वाढून दिल... आज पर्यंत अनुने कधी स्वतःहून जेवणच ताट देखील  घेतलं नव्हतं पण आज चक्क ती स्वतःच्या हाताने जेवण घेऊन खात होती आणि तिने मला पण जेवायला वाढलं होत... 
मी तिला घास भरवायला हात पुढे केला, तर ती बोलली 
" आऊ तू पण काही खाल्लं नाहीये दिवसभर खाऊन घे तू आधी. माझं माझं मी खातेय ना."
अनु खूप वेगळी वाटत होती मला मी ज्या अनुला ओळखते ती ही नक्कीच नाही अस मला वाटायला लागलं होतं . तिच्यातला हा बदल मला खूप बैचेन करत होता. अधीर करत होता.
 जेवण झाल्यावर तिने स्वतःच ताट उचलून किचन मधे नेलं आणि घासायला लागली. तर मी तिला बोलली.
" बेटा तू खूप थकली आहेस... जा झोपून घे..
"मी काम करतेय ना..
बेटा जा ना किती वेळ झाला आहे 
अनु काही ऐकतच नव्हती माझं शेवटी मी तिला बोलली की जा पापांना काय हवं आहे का बघून ये तेव्हा कुठे ती गेली. मी पटापट काम आवरून घेतली. आता रात्रीचे सडे अकरा वाजले होते.. मी माझं शाळेचं काम करायला घेलत दिवसभराच्या गडबडीत मला काहीच काम करत आलं कम नव्हतं.. मला उद्याच्या उद्या ते शाळेत जमा करायचं होतं...
अनु ही आता यांच्या कुशीत झोपून गेली होती......मी काम करायला हॉल मधे आली..
काम करत करता मला  कधी झोप लागली हे मला कळलंच नाही.... नंतर बऱ्याच वेळाने मला अचानक जाग आली सकाळचे सडे तीन वाजले होते... पाहते तर काय माझ्या अंगावर कोणीतरी चादर पांघरवली होती.. मला खूप आचार्य वाटलं की कोणी मला चादर पांघरवली होती  यांची तर तब्बेत ठीक नव्हती ना.. मी यांना आणि अनुला पाहायला यांच्या रूम मधे गेली तर पहाते तर काय.. अनु आता देखील त्यांच्या उशाशी बसली होती.... यांच्या कपाळावर त्या थंड पाण्याच्या रुमलाच्या पट्टया ठेवत..