Tuesday, 19 July 2016

आज गुरुपोर्णीमा , आज शिष्यानी गुरुना वंदन करायच असत. गुरुदक्षिणा द्यायची असते.... पण आमचे गुरु श्री.ऐ के शेख यांनी आज आयुषभर सोबत करेल अशी शिकवण दिली जी आम्ही सोबत ठेऊ शिदोरी सारखी...........शेख काका बोलले की कवी हे परमेश्वराचा स्पर्श झालेली माणस असतात, अस कोणाला पण किविता लिहता येत नाही...गझल लिहता येत नाही.... म्हणून त्याच्या साहित्यात परमेश्वराचे गुण उतरायला पाहिजे. त्याचा कविता आशावादी, निरागस, निरपेक्ष आणि मानवतेच व्यापक दर्शन घडवणाऱ्या असल्या पाहिजे.
             आकाशाला स्पर्श करण्याची परवानगी फक्त झाडांना, पक्षांना आणि गझल काराला असते. स्वताच्या वेद्नेने आपल्या डोळ्यात पानी येत पण इतरांच्या वेद्नेने ही डोळे भरायला पाहिजे. आणि देवा कड़े ही प्राथना केली की स्वताच दुःख सहन करता येईल एवढी शक्ति आम्हाला देऊ नकोस इतरांच दुःख पेलता येईल एवढी तकाद आम्हाला दे.
              मी स्वताला खूप भाग्यवान समजतो की त्यांचा एवढा सहवास मला लाभला त्यांना कोटी कोटी प्रणाम.......
आणि काय सुंदर मैफिल रंगली आज.... काळजची भाषा आणि वेदनेचे सोहळे क्या बात है आज सगळ्याच्या गझला खूप छान झाल्या..................आपला सतिष अहिरे







6 comments: