वी. स. खांडेकर यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगली येथे झाला. आणि मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६ रोजी मिरज येथे झाला.
त्यांचं जन्म नाव गणेश आत्माराम खांडेकर होत. ते प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांची ययाती ही सगळ्यात प्रसिद्ध कादंबरी आहे .
वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी) साठी मिळाला आणि पद्मभूषण पुरस्कार (१९६८) तसेच ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी मिळालं त्यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.
त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.
इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
सुनीलकुमार लवटे यांनी वि.स. खांडेकरांचे चरित्र लिहिले आहे; त्यासाठी डाॅ. अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने अर्थसाहाय्य केले आहे.
अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे. आणि त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके पुढील प्रमाणे आहेत .
१ अजून येतो वास फुलांना, २अमृत (पटकथा) ,३अमृतवेल
४ अविनाश, ५ अश्रू, ६ अश्रू आणि हास्य ७ आगरकर व्यकी आणि विचार, ८ उल्का (१९३४) (कादंबरी व पटकथा) ९ उःशाप, १०कल्पलता ११कांचनमृग (१९३१) १२ कालची स्वप्ने, १३ कालिका, १४ क्रौंचवध (१९४२), १५घरटे, १६ घरट्याबाहेर १७चंदेरी स्वप्ने, १८ चांदण्यात
छाया (पटकथा) १९ जळलेला मोहर , (१९४७ ) २० जीवनशिल्पी, २१ ज्वाला (पटकथा), २२ झिमझिम, २३तिसरा प्रहर, २४ तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३. २५ ते दिवस, ती माणसे ,२६ दंवबिंदू ,२८देवता (पटकथा)
२८ दोन ध्रुव (१९३४), २९ दोन मने (१९३८), ३०धर्मपत्नी(पटकथा), ३१ धुके, ३२ नवा प्रातःकाल ३३ परदेशी (पटकथा) , ३४ पहिली लाट ,३५ पहिले पान
३६ पहिले प्रेम (१९४०) ३७ पाकळ्या ३८ पांढरे ढग (१९४९) ३९ पारिजात भाग १, २ ४० पाषाणपूजा , ४१ पूजन, ४२ फुले आणि काटे ४३ फुले आणि दगड ४४ मंजिऱ्या, ४५ मंझधार ४६ मंदाकिनी ४७ मध्यरात्र ४८ मृगजळातील कळ्या ४९ ययाति ५० रंग आणि गंध ५१ रिकामा देव्हारा (१९३९) ५२ रेखा आणि रंग ५३लग्न पहावे करून (पटकथा व संवाद) ५४ वामन मल्हार जोशी : ५५ व्यक्ति-विचार ५६ वायुलहरी ५७ वासंतिका ५८ विद्युत् प्रकाश ५९ वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८) ६० समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
६१ समाधीवरील फुले ६२ सहा भाषणे ६३ सांजवात ६४ साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
६५ सुखाचा शोध ६६ सुवर्णकण ६७ सूर्यकमळे ६८ सोनेरी ६९ सावली (पटकथा) ७० सोनेरी स्वप्ने भंगलेली. ७१ स्त्री आणि पुरुष ७२ हिरवळ ७३ हिरवा चाफा (१९३८)
७४ हृदयाची हाक (१९३०) ७५ क्षितिजस्पर्श
पुढे वी. स खांडेकरांच्या कवितेतील काही ओळी व त्यांचं रस ग्रहण देत आहे
कोण दुजा आधार ?
तुजविण, कोण दुजा आधार ?
( हे पती परमेश्वरा तुझ्या विना आता मला हा कोणता आधार आहे अशी वी . स खांडेकर पती परमेश्वराला करून हाक मारत आहेत )
अवतीभवती पहा दाटला अवसेचा अंधार
काजळले नभ, काजळले मन, व्याकुळले मी फार
( आवती भवती अवसेचा खूप अंधार दाटला आहे . नभ आता त्या आधारे व्यापून गेलं आहे . आणि अशा उदास वातावरणात माझं मन देखील खूप उदास झालं आहे खिन्न झालं आहे व्याकूळ झालं आहे )
कशि सावरू ? कुठे निवारा ? घालु कुणावर भार ?
पतितपावना एक तुझे मज उघडे आता दार
( आता मी स्वतःला कसं सावरु , आता कुठे मला प्रमाचा निवारा भेटेल. आता मी माझं दुःख कोणाला सांगू त्याचा भार कसा हलक करू .
एक एक ओळ अंगावर काटा आणतो. आपल्या काळजाच्या वेदनांना केवढ्या प्रभावी पने आणि तरल ते ने त्यांनी मांडलं आहे. कुठे ही शब्दांची अती शोक्ती नाही.. ना कुठे ही अवजड अशा शब्दांचा वापर नाही. त्या मूळचे त्याची कविता ही खूप जिवंत वाटते बोलली वाटते. काळजाला भिडते .
अशा थोर लेखकाला माझे कोटी कोटी प्रणाम.
( सतिष अहिरे )
Thanks dear
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete