Tuesday, 31 December 2019
मनाच्या आत जागा दे
सखीच हे वर वरचे वागणं काही ठीक नाही तिने मनाच्या आता आपल्या प्रेमाला जागा दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं अंतर हे आमच्या मधे नको आता.आजची गजल नक्की बघा मित्रानो तुम्हला खूप आवडेल खूप आवडेल.
Saturday, 21 December 2019
सखी
सखी ची काही औरच बात होती. माझ्या मिठीत आल्यावर ती सगळ्या जगाला विसरून जायची, वेडी व्हायची. किती किती आणि काय काय सांगायचं सखीच
Friday, 20 December 2019
काही मनातलं मंथन
काही मनातलं
एका लेखकाच्या मनाची अवस्था ओळखणं खूप कठीण असतं. लेखक मुळातच खूप संवेदनशील असल्या कारणाने कोणत्या घटनेचा त्याचा मनावर काय परिणाम होईल हे सांगता येन खूप कठीण आहे. नेमकी कोणती गोष्ट त्याच्या मनात घर करून बसली आहे ,कोणत्या गोष्टीसाठी त्याच मन बेचैन झालं आहे ,कोणती गोष्टी मुळे तो अस्वस्थ झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे.
दुसऱ्या कोणाच्या मनाला एकदम सामान्य वाटणारी गोष्ट पण लेखकाच्या मनावर खूप परिणाम करून जाते. त्याच्या मनात विचारांचं मग मंथन तयार करून जाते आणि ते समुद्र मंथना पेक्षा ही खूप 'अफाट 'असतं 'विराट' असतं, कधी त्याच्यातून जीवन संजीवनी देणार अमृत बाहेर पडत तर कधी या सुष्टीचा अंत करणार हलाहल बाहेर पडत. एक आग लागते बस त्याच्या तना-मना मधे आणि तो रोजच जळत असतो त्यात....... सतिष अहिरे
काही मनातलं
दुपारी कामाच्या गडबडीत मला खूप भूक लागली होती, मी ऐरोली ला होतो कामाला. डॉक्टरांना यायला जरा अवकाश होता तर पटकन काही खाऊन घेऊ या विचारांनी मी हॉस्पिटल च्या बाहेर आलो ... थोडं चालल्यावर एक प्रशस्त अस मिठाईचं दुकान दिसलं , त्यात फुडकोर्ट पण होता. मी लगेच वडापाव द्यायला सांगितलं , तिकडे काम करणारा एक मुलगा मला बोलला की 'पहले कुपन लिके आइये ' मी ठीक आहे असं त्याला बोललो आणि कुपन घ्यायला आत मधे गेलो. आत मधे बसलेल्या इसमाला ही मराठी बोलत येत नव्हतं . मी कुपन घेऊन बाहेर आलो त्या मुलाकडे ते कुपन दिल आणि त्याला वडापाव द्यायला सांगितला, मी जास्त तिखट खात नाही म्हणून त्याला बोललो की फक्त गोड चटणी टाक वडापाव मध्ये. मी काय बोलतोय त्याला कळेचना मी त्याला पुन्हा पुन्हा तेच सांगितलं तरी कळलं नाही त्याला नंतर त्याला बोललो को सिर्फ मिठा चटणी लगाना तेव्हा काही त्याला कळाल. मला खूप आचार्य वाटलं की एवढं सुद्धा मराठी त्या मुलाला कळू नये .ते ही एवढे वर्ष महाराष्ट्र्रात राहून . त्यातल्या त्यात वडापाव हा १००% मराठी पदार्थ आणि जास्ती जास्त खाणारे पण मराठी लोक , पण ते बनवणारे आणि विकणारे हे परप्रांतीय.
काय विडंबना आहे ही...
तुम्ही कधी इडली डोसा खायला जा तो बनवणारा हा मद्रासी माणूसच आणि खाणारा मराठी , समोसे कधी खायला जा तर तो बनवणारा युपी किव्हा मारवाडी आणि खाणारा मराठी चाट खायला जा तो तर मारवाडी गुजराती किव्हा बंगाली असतो. आणि खाणारा मराठी
अगदी बोटावर मोजता येतील असे मराठी लोक आता या वेवसायत उरले आहेत
ते लोक बाहेरून आले त्यांच्या पदार्थांची आपल्याला सवय लावली आणि आपले पदार्थ त्यांनी शिकून घेतले... आणि त्यांचा वेवसाय केला आणि त्यांना मोठं पण केले..
मित्रांनो जर असे पदार्थ विकणारा कोणी मराठी वेक्ती तुम्हाला भेटला तर नक्की त्याच्या कडूनच पदार्थ खरेदी करा आणि आपल्या मित्रांना ही त्यांचा कडून खरेदी करायला सांगा.....
Sunday, 15 December 2019
Monday, 9 December 2019
Tuesday, 3 December 2019
खांद्यावरच्या पदराला
सखी जेव्हा पहिल्यादा साडी घालून माझ्या समोर आली होती तेव्हा काळजाच नुस्तं पाणी पाणी झालं होतं.... किती सुंदर दिसत होती सखी तीच एक एक अदा बस घायाळ करता होती. सखी कडे सारख पाहत राहावंसं वाटत होतं.
तिच्या हसण्याला तिच्या लाजण्याला किती किती आणि काय काय साठवायचे डोळ्यात काही कळत नव्हतं आणि वरतून हा वारा तिच्या पदराला उडवत होता आणि ती आपला पदर सावरत होती . मित्रांनो आजची चारोळी नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल.
Saturday, 23 November 2019
Subscribe to:
Comments (Atom)
