दुपारी कामाच्या गडबडीत मला खूप भूक लागली होती, मी ऐरोली ला होतो कामाला. डॉक्टरांना यायला जरा अवकाश होता तर पटकन काही खाऊन घेऊ या विचारांनी मी हॉस्पिटल च्या बाहेर आलो ... थोडं चालल्यावर एक प्रशस्त अस मिठाईचं दुकान दिसलं , त्यात फुडकोर्ट पण होता. मी लगेच वडापाव द्यायला सांगितलं , तिकडे काम करणारा एक मुलगा मला बोलला की 'पहले कुपन लिके आइये ' मी ठीक आहे असं त्याला बोललो आणि कुपन घ्यायला आत मधे गेलो. आत मधे बसलेल्या इसमाला ही मराठी बोलत येत नव्हतं . मी कुपन घेऊन बाहेर आलो त्या मुलाकडे ते कुपन दिल आणि त्याला वडापाव द्यायला सांगितला, मी जास्त तिखट खात नाही म्हणून त्याला बोललो की फक्त गोड चटणी टाक वडापाव मध्ये. मी काय बोलतोय त्याला कळेचना मी त्याला पुन्हा पुन्हा तेच सांगितलं तरी कळलं नाही त्याला नंतर त्याला बोललो को सिर्फ मिठा चटणी लगाना तेव्हा काही त्याला कळाल. मला खूप आचार्य वाटलं की एवढं सुद्धा मराठी त्या मुलाला कळू नये .ते ही एवढे वर्ष महाराष्ट्र्रात राहून . त्यातल्या त्यात वडापाव हा १००% मराठी पदार्थ आणि जास्ती जास्त खाणारे पण मराठी लोक , पण ते बनवणारे आणि विकणारे हे परप्रांतीय.
काय विडंबना आहे ही...
तुम्ही कधी इडली डोसा खायला जा तो बनवणारा हा मद्रासी माणूसच आणि खाणारा मराठी , समोसे कधी खायला जा तर तो बनवणारा युपी किव्हा मारवाडी आणि खाणारा मराठी चाट खायला जा तो तर मारवाडी गुजराती किव्हा बंगाली असतो. आणि खाणारा मराठी
अगदी बोटावर मोजता येतील असे मराठी लोक आता या वेवसायत उरले आहेत
ते लोक बाहेरून आले त्यांच्या पदार्थांची आपल्याला सवय लावली आणि आपले पदार्थ त्यांनी शिकून घेतले... आणि त्यांचा वेवसाय केला आणि त्यांना मोठं पण केले..
मित्रांनो जर असे पदार्थ विकणारा कोणी मराठी वेक्ती तुम्हाला भेटला तर नक्की त्याच्या कडूनच पदार्थ खरेदी करा आणि आपल्या मित्रांना ही त्यांचा कडून खरेदी करायला सांगा.....
No comments:
Post a Comment