Sunday, 12 July 2015

परवा ठाण्यात खूप छान तरही मुशायरा झाला....गझलनवाब श्री भीमराव पांचाळे ,ऐ.के.शेख, आप्पा ठाकुर, अबिद मुन्शी ,रामधरने काका  आणि अन्य मान्यवरांच्या सोबत हा मुशायरा झाला.   मुशायऱ्याची ओळ होती- अजून माझा जगवयाचा विचार बाकी.......आणि मी सादर केलेली ग़ज़ल ही अशी --    

मानस केला कधी असा तो करार बाक़ी
( अजून माझा जगावयाचा विचार बाक़ी)

असे किती श्वास घेतले बघ जगायला मी
जरा असे मांडता हिशोबा उधार बाक़ी

तुला सखे जिंकण्या पाहण्यास हरलो मी
असेच आयुष्य जावयाचे जुगार बाक़ी

जखम अशी काळजावरी खोल आत केली
किती असे तेच सांग आहेत वार बाक़ी

बरेच आलेत मित्र ते जीवनात कही
तरी खरे यायचे अजुनीच यार बाक़ी  
               
             सतिष अहिरे
                 

  

12 comments:

  1. वाह व्वा...सुंदर

    ReplyDelete
    Replies
    1. थैंक्स विषाल तुझी कमी जनावली तिकडे खूप छान झाला मुशायरा भीमराव जी स्वता माझ्याशी बोलले.

      Delete
    2. हा विषाल आणि ही एक दिवसात तयार केलेली गझल आहे एका दिवसा आधीच शेख काकानी ओळ दिली होती

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद तुमचे गायत्री जी.

      Delete
    2. हा आणि खूप छान अनुभव होता मुशायऱ्याचा. ही गझल पण एका। दिवसात लिहून पूर्ण झाली . आणि तिला लोकांची खूप चांगली दाद भेटली .

      Delete
  3. Replies
    1. सर कसे आहात तुमचा अभिप्राय आला , खूप चांगल वाटल. हा आणि खूप चांगली मैफिल झाली .फार वेगळा अनुभव होता तो माझ्या साठी.

      Delete
  4. विषाल आता परत असेल तेव्हा येना मग

    ReplyDelete
  5. थैंक्स कुणाला

    ReplyDelete